स्पेससूट घालून, यानात बसून अंतराळात सफर करुन आलेत 'हे' प्राणी

अंतराळ पोहिमेदरम्यान अनेक प्राण्यांना अंतराळात पाठवण्यात आले. यातील अनेक प्राणी पुन्हा पृथ्वीवर जिवंत आले.  

Oct 09, 2023, 21:07 PM IST

Animals in Space: सध्या अनेक देशांच्या आंतराळ संस्था मानवी आंतराळ मोहिमा राबवत आहेत. मात्र, मानवी मोहिमा यशस्वी होण्याआधी अनेक प्राण्यांना अंतराळात पाठवण्यात आले होते. यापैकी अनेक प्राणी पुन्हा पृथ्वीवर जिवंत परतले. जाणून घेऊया कोणते प्राणी अंतराळात सफर करुन आले आहेत. 

1/7

कुत्रा, उंदीर, माकड, कासव यासारखे अनेक प्राणी अंतराळात सफर करुन पुन्हा पृथ्वीवर जिवंत परतले.

2/7

1963 मध्ये फ्रान्सनं सर्वप्रथम फेलिसिटी या मांजराला अंतराळात पाठवण्यात आलं होतं. अंतराळातून परतल्यानंतर तिचा स्वभाव चिडचिडा झाला. 

3/7

1968 मध्ये  रशियाने झोंड 5 नावाच्या अंतराळयानामधून दोन कासवांना अवकाशात पाठवले. सहा दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर ते पृथ्वीवर परतले.

4/7

सोव्हिएत युनियनने सर्वात जास्त कुत्रे अंतराळात पाठवले आहेत. 1957 मध्ये लाइका नावाची कुत्री अंतराळात पाठवली होती. 

5/7

अवकाशातील वातावरणाचा मानवावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी उंदीरही अवकाशात पाठवण्यात आले होते. नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उंदीर पाठवला होता. पहिला उंदीर 1950 मध्ये 137 किलोमीटर अंतराळात पाठवण्यात आला होता. मात्र पॅराशूट निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

6/7

1949 मध्ये सर्व प्रथम एका माकडाला अंतराळात 134 किलोमीटर अंतरावर नेण्यात आले. परंतु परत येत असताना त्याचा मृत्यू झाला.  यानंतर 1961 मध्ये हॅम नावाच्या चिंपांझीला नासाने अंतराळात पाठवले, ते सुखरूप पृथ्वीवर परतले.

7/7

अंतराळात जाणारा पहिला सजीव या माशा आहेत. 1947 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्यासाठी  V-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून 109 किलोमीटर उंचीवर या माशा अवकाशात पाठवल्या होत्या. यानंतर पुन्हा पॅराशूटद्वारे न्यू मेक्सिकोमध्येही त्यांना उतरवण्यात आले. कॅप्सूल उघडले असता माशा जिवंत आढळल्या.