बर्फाच्या समुद्रातून येतंय जगावर मोठं संकट; पाहा चिंता वाढवणारे Photos

Antarctic Sea Ice : असाच जगाला कायमच आश्चर्यचकित करणारा जगातील एक अद्वितीय भाग म्हणजे अंटार्क्टीक महासागर आणि त्यानजीकचा परिसर.   

Sep 19, 2023, 13:22 PM IST

Antarctic Sea Ice : आपण जेव्हाजेव्हा जगातील काही अद्वीतीय ठिकाणांविषयी बोलू लागतो त्यावेळी कायमच आपली प्रतिक्रियाच सर्वकाही बोलत असते. 

 

1/7

आश्चर्याचा विषय

Antarctic sea ice at the highest low see photos

जगासाठी आश्चर्याचा असणारा हा परिसर सध्या जगाची चिंता वाढवतोय. कारण, ठरतेय ती म्हणजे जागतिक तापमानवाढ.   

2/7

अंटार्क्टीक महासागर

Antarctic sea ice at the highest low see photos

आपल्या दैनंदिन आयुष्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या अंटार्क्टीक महासागरात असे काही बदल पाहायला मिळत आहेत जे तुम्हाला चिंतेत टाकू शकतात.   

3/7

जागतिक तापमानवाढ

Antarctic sea ice at the highest low see photos

कारण ठरतंय ते म्हणजे जागतिक तापमानवाढ. एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार अंटार्क्टीकातील बर्फाचं प्रमाण मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे.   

4/7

17 मिलियन चौरस किलोमीटर

Antarctic sea ice at the highest low see photos

जागतिक तापमानवाढीमुळं इथं कमी होणारी बर्फाची पातळी नेमकी किती आहे याचं चित्र अधिक स्पष्ट होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार सध्या हे बर्फाचं प्रमाण 17 मिलियन चौरस किलोमीटर इतकंच असल्याचं सांगितलं जात आहे.   

5/7

विक्रमी नोंद

Antarctic sea ice at the highest low see photos

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 1.5 मिलियन चौरस किलोमीटर बर्फ इथं कमी असल्याचं आढळून आलं. मागील तास वर्षांमधील ही विक्रमी नोंद ठरत आहे.   

6/7

तापमानाच्या आकड्यावर नियंत्रण

Antarctic sea ice at the highest low see photos

अंटार्क्टीकातील परिसर जगातील तापमानाच्या आकड्यावर बहुतांशी नियंत्रण ठेवताना दिसतो. पण, आता मात्र बर्फ वितळण्याचा वेग वाढल्यामुळं य़ेत्या काळात जीवघेण्या साथींचं प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.   

7/7

निसर्गचक्रानुसार...

Antarctic sea ice at the highest low see photos

निसर्गचक्रानुसार अंटार्क्टीकामध्ये असणारा पांढरा पृष्ठभाग सूर्याच्या उर्जेला परावर्तित करून वातावरणात पाठवतो आणि तिथं असणाऱ्या पाण्याचं तापमान थंडच राहतं. (छाया सौजन्य- Dr Robbie Mallett)