PHOTO : 'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

किल्ले रायगडावर शिवरायांच्या राज्यभिषेक झाला आणि याच दिवशी महाराजांनी त्याचं चलनसुद्धा स्वराज्यात लागू केलं होतं.

Jun 06, 2019, 13:04 PM IST

किल्ले रायगडावर शिवरायांच्या राज्यभिषेक झाला आणि याच दिवशी महाराजांनी त्याचं चलनसुद्धा स्वराज्यात लागू केलं होतं. ६ जून १६७४ या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच दिवसापासून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. औरंगाबादच्या आशितोष राहणे पाटील या तरुणानं याच 'शिवराई'चं संकलन केलं आहे. महाराजांनी यावेळी दोन प्रकारची नाणी चलनात आणली होती. त्यापैंकी एक 'शिवराई होन' म्हणजे साडे तीन रुपये, हे सोन्याचं असायचं. तर दुसरा प्रकार होता फक्त 'शिवराई'... शिवराई तांब्याची असायची. 

1/6

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

शिवकालीन नाण्यांवर उर्दू किंवा फारसी अक्षर असायची मात्र महाराजांच्या नाण्यांवर फक्त देवनागरी लिपी होती. त्यावर 'श्री राजा शिव छत्रपती' असं बिरूद कोरलं असायचं.

2/6

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

शिवराईचा छंद लागलेला आशितोष आता ऐतिहासिक गोष्टीचं संकलण करणारा एक अवलीयाच झाला आहे. त्याच्या संग्रहात शिवकालीन हत्यारे, तलवारी, भाले, इतकंच नाही तर तोफगोळे सुद्धा आहेत.

3/6

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

भविष्यात यातंच संशोधन करुन करिअर घडवण्याचा त्याचा मानस आहे. १८ वर्षाच्या या अवलियाचे स्वराज्याच्या चलनावर दोन पुस्तकंही प्रकाशित झाले आहेत, हरवलेला इतिहास आशितोष तुमच्या-आमच्या पर्यंत आणण्याचा तो प्रयत्न करतोय.  

4/6

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

शिवराईचा छंद लागलेला आशितोष आता ऐतिहासिक गोष्टीचं संकलण कऱणारा एक अवलीयाच झाला आहे. त्याच्या संग्रहात शिवकालीन हत्यारं, तलवारी, भाले,  इतकंच नाही तर तोफगोळे सुद्दा आहेत.

5/6

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

शिवकालीन हस्तलिखीत आशितोषनं जमवलं आहे, तर संत कबीरांचे हस्तलिखीत दोहे सुद्धा त्याच्याकडे आहेत.

6/6

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

'शिवराई' संग्रहाचा छंद जडलेला अवलिया

आशितोष राहणे पाटीलने सांगितले की, 'प्राचीन नाणी जमवणे हे आता माझं आयुष्य झालं आहे. आतापर्यंत माझी २ पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. पुढे यातच करियर करण्याची माझी इच्छा आहे.'