अमिताभ बच्चन यांचा महा-फ्लॉप चित्रपट, बजेटही वसूल करू शकला नाही, तुम्ही पाहिला का?

अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच पण त्यांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपटाबद्दल  माहित आहे का? 

Soneshwar Patil | Feb 23, 2025, 17:03 PM IST
1/7

बॉलिवूडचे महानायक म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन यांना ओळखलं जातं. वयाच्या 82 व्या वर्षी देखील ते इंडस्ट्रीमध्ये खूप सक्रिय आहेत. त्यांनी अभिनयाद्वारे लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

2/7

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये त्यांचे अनेक चित्रपट हिट, तर काही सुपरहिट तर काही ब्लॉकबस्टर देखील ठरले.

3/7

अमिताब बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी 130 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1969 मध्ये त्यांनी 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. 

4/7

70च्या दशकामध्ये त्यांनी एकापाठो-पाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, अशातच त्यांना बॉक्स ऑफिसवर काही फ्लॉप चित्रपटांचा देखील सामना करावा लागला. 

5/7

आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. जो बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. या चित्रपटाने चित्रपटाच्या बजेट इतकी देखील कमाई केली नाही. 

6/7

हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. 36 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव 'गंगा जमुना सरस्वती' आहे. 1988 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

7/7

या चित्रपटाचे बजेट 8 कोटी रुपये इतके होते. तर या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर फक्त 5 कोटी रुपयांची कमाई केली होती. IMDb ने या चित्रपटाला 10 पैकी फक्त 4 रेटिंग दिली आहे.