बारावीनंतर दोन कोर्स करा एकत्र! ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे जाणून घ्या

Education News: ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा  निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

| May 20, 2024, 14:49 PM IST
1/10

Dual Degree Program: बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा  निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

2/10

बऱ्याच वेळा उमेदवार कोर्स किंवा विषय निवडण्यात बराच वेळ घालवतात आणि तरीही पुढे काय करावे हे त्यांना नीट समजत नाही. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्याकडे ड्युअल डिग्री प्रोग्रामचा पर्याय देखील आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते 2 कोर्स एकत्र करू शकता. 

3/10

ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय?

ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीनंतर दोन वेगवेगळे अभ्यासक्रम करायचे असतील तर त्यांच्यासाठी ड्युअल डिग्री प्रोग्रामची सुविधा देण्यात आली आहे. अनेक विद्यापीठांमध्ये विविध विषयांसाठी तुम्हाला दुहेरी पदवी घेता येते. याअंतर्गत विद्यार्थ्यांना आता एकाच स्तरावर अभ्यासाच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये दुहेरी पदवी मिळू शकणार आहे.

4/10

विद्यापीठे ठरवतात

प्रवेशासाठी पात्रता निकष आणि एकाच वेळी दोन पदवी निवडण्याची उपलब्धता संबंधित विद्यापीठे ठरवतात. जर तुम्ही मानसशास्त्र तसेच व्यवसाय प्रशासनात दुहेरी पदवी घेत असाल, तर तुम्ही एकाच वेळी बीए मानसशास्त्र आणि बीबीए पदवी प्राप्त करु शकता.

5/10

दुहेरी पदवी कोणत्या विषयात करता येते?

दुहेरी पदवी दुहेरी पदवीपूर्व पदवी, बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी म्हणून ओळखली जाऊ शकते. 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा आहे ते बीटेक + एमबीए, बीए + एलएलबी, बीटेक + एलएलबी, बीटेक + एमएस, बीई + एमई, बीएड + एमएड इत्यादी अभ्यासक्रम निवडू शकतात. 

6/10

ड्युअल डिग्री प्रोग्राम

जर तुम्हाला 12वी नंतर एकाच वेळी दोन डिग्री घ्यायच्या असतील तर तुम्ही एक पदवी ऑफलाइन आणि दुसरी ओपन आणि डिस्टन्स लर्निंगद्वारे किंवा दोन्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता. तुम्ही समान किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून ड्युअल डिग्री प्रोग्राम देखील करू शकता.

7/10

दुहेरी पदवी केल्याचा फायदा

ड्युअल डिग्री प्रोग्रामची सुविधा मिळाल्याने विद्यार्थी आता एकाचवेळी दोन पदवी घेऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना एकाच प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागले. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकेल.

8/10

एकाच वेळी दोन डिग्री कशा करायच्या?

जर तुम्हाला 12वी नंतर एकाच वेळी दोन डिग्री घ्यायच्या असतील तर तुम्ही एक पदवी ऑफलाइन आणि दुसरी ओपन आणि डिस्टन्स लर्निंगद्वारे किंवा दोन्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता. तुम्ही समान किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून ड्युअल डिग्री प्रोग्राम देखील करू शकता.

9/10

दुहेरी पदवी केल्याचा फायदा

ड्युअल डिग्री प्रोग्रामची सुविधा मिळाल्याने विद्यार्थी आता एकाचवेळी दोन पदवी घेऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना एकाच प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागले. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकेल.

10/10

नोकरी मिळण्याची शक्यताही वाढते

सर्वसाधारणपणे 2 वेगवेगळे कोर्स करायला तुम्हाला 4 किंवा 5 वर्षे लागतात. पण तुम्ही दोन्ही कोर्स एकाचवेळी केल्यास कमी वेळेत 2 डिग्री मिळवू शकाल हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यताही वाढू शकते.