Best Hotel In The World: जगातील सर्वोत्तम हॉटेल USA, UK मध्ये नाही तर भारतात! पाहा Photos, एका दिवसाचं Rent किती?

Best Hotel In The World Photos: जगातील सर्वोत्तम हॉटेल कोणतं असं तुम्हाला विचारल्यास तुम्ही नक्कीच अमेरिका किंवा ब्रिटनमधील एखाद्या हॉटेलसंदर्भात विचार कराल. मात्र जगातील सर्वोत्तम हॉटेल भारतात आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालामध्ये एका भारतीय हॉटेलला Best Hotel In The World चा सन्मान मिळाला आहे. हे हॉटेल कोणतं आहे, त्यात काय खास आहे, त्यामधील रुमचे दर किती आहेत हे आपण पाहूयात...

| May 26, 2023, 17:42 PM IST
1/14

Best Hotel In The World

जगातील सर्वोत्तम हॉटेल कुठे आहे? असा प्रश्न तुम्हाला विचरला तर तुम्ही नक्कीच अमेरिका किंवा ब्रिटनमधील एखाद्या हॉटेलचा विचार कराल. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये जगातील सर्वोत्तम हॉटेलचा मान एका भारतीय हॉटेलला मिळाला आहे.

2/14

Best Hotel In The World

भारतामधील राजस्थान येथे असलेल्या रामबाग पॅलेस हॉटेलला जगातील सर्वोत्तम हॉटेलचा मान मिळाला आहे.

3/14

Best Hotel In The World

'ट्रीपअ‍ॅडव्हायझर' या ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये या हॉटेलची जगभरातील पर्यटकांनीच सर्वोत्तम हॉटेल म्हणून निवड केली आहे.

4/14

Best Hotel In The World

'ट्रीपअ‍ॅडव्हायझर'ने नुकताच आपला एक सर्वेक्षण अहवाल सादर केला. '2023 ट्रॅव्हलर्स चॉइस बेस्ट ऑफ बेस्ट टॉप हॉटेल्स' असं या अहवालाचं नाव आहे. या वेबसाईटवरील लिस्टेड 8 लाख हॉटेल्सपैकी 1 टक्क्यांहून कमी हॉटेल्सचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

5/14

Best Hotel In The World

रामबाग पॅलेस हॉटेलचं व्यवस्थापन ताजकडून म्हणजेच टाटा ग्रुपकडून केलं जातं. हे हॉटेल राजस्थानमधील जयपूर येथे आहे. हे जगातील सर्वोत्तम हॉटेल असल्याचं 'ट्रीपअ‍ॅडव्हायझर'ने सर्वेक्षणाच्या आधारे म्हटलं आहे.

6/14

Best Hotel In The World

'ट्रीपअ‍ॅडव्हायझर'च्या माहितीनुसार 5 हजारांहून अधिक लोकांनी रामबाग पॅलेसला 5 स्टार रेटिंग दिलं आहे. 

7/14

Best Hotel In The World

रामबाग पॅलेस हे मुळचा एक जुना राजवाडा आहे. हे महाल 1835 साली बांधण्यात आलं होतं. अनेक राजेशाही घराण्यांकडे या वाड्याची मालकी राहिली आहे.

8/14

Best Hotel In The World

या महालाची मालकी महाराज सवाई मान सिंग दुसरे आणि त्यांची पत्नी महाराणी गायत्री देवी यांच्याकडेही होता.

9/14

Best Hotel In The World

सध्या ताजकडून व्यवस्थापन पाहिल्या जाणाऱ्या रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 78 रॉयल रुम्स आहेत. हे सर्व रुम आधीच्या राजांचेच आहेत असं सांगितलं जातं.

10/14

Best Hotel In The World

राजवाड्याचं मुळ स्वरुप तसेच ठेऊन त्यामध्ये आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

11/14

Best Hotel In The World

जुना वाडा आणि आधुनिक सुविधा यामुळे रामबाग पॅलेस हॉटेलला छान रॉयल लूक मिळाला आहे.

12/14

Best Hotel In The World

रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये बरीच मोकळी जागा असल्याने या ठिकाणी अनेकदा मोरही दिसून येतात.

13/14

Best Hotel In The World

प्रिन्स चार्ल्स, जॅकलिन कॅनडी यासारखे मान्यवरही रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये राहून गेले आहेत.

14/14

Best Hotel In The World

रामबाग पॅलेस हॉटेलमधील एका रुमचं एका रात्रीचं भाडं हे 29 हजार 500 रुपयांपासून 3 लाख 12 हजार रुपयांपर्यंत आहे. (फोटो - ताज हॉटेलच्या वेबसाईटवरुन)