बुर्ज खलिफापेक्षा उंच असलेला महाराष्ट्रातील भैरवगड किल्ला; जीव धोक्यात घालून करतात ट्रेगिंक

माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला हा चढाईसाठी अतिशय कठिण किल्ला मानला जातो. रोप बांधल्याशिवाय ट्रेकर या किल्ल्यावर चढाई करुच शकत नाहीत. 

Jul 09, 2023, 20:28 PM IST

Moroshicha Bhairavgad Fort : महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्यद्री पर्वत रांगांच्या कुशीत अनेक भव्य किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्यांपैकी एक आहे तो माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला. हा किल्ला दिबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच असल्याचा दावा केला जात आहे. येथे जाणारे ट्रेकर्स  जीव धोक्यात घालून  ट्रेगिंक करतात.

 

1/6

मोरोशीचा भैरवगड... माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे.  या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. 

2/6

एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट.  क्लाइंबिंग रॅपलिंग थरारक अशा पायऱ्या चढताना पोटात गोळा येतो. 

3/6

आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी हा खोली या किल्ल्याच्या उंचीवरुन दिसते. 

4/6

ट्रेकिंगसाठी हा अत्यंत कठिण किल्ला मानला जातो. 

5/6

भैरवगड किल्ला हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसतो. 

6/6

 किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक रचना तयार होतात त्यापैकी एक बालेकिल्ल्या वरील रचना म्हणजे "डाईक" ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते