शरद पवार गटाला मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची... पाहा कुणाकडे किती संख्याबळ?
NCP Reslut : निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटंलय. अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार आहेत. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र ठरले आहेत. तर शरद पवार गटाचेही आमदार पात्र ठरले आहेत. शरद पवार आणि अजित पवार गटाकडे किती संख्याबळ आहे पाहूयात.


निकालावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. सगळेच पात्र..न्याय मात्र अपात्र - भाग २ हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने, लोकशाहीला चिरडून हसतोय मोठ्या माजाने... पण शेवटी खरे कोण आणि खोटे कोण? हे अखेर जनतेच्या कोर्टात ठरणारंच आहे... खरी लढाई जनतेच्या कोर्टात होईलच... जनता सत्याच्या अर्थात आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीच्याच पाठीशी खंबीर उभी राहील.. जनतेच्या कोर्टात गद्दारांना क्षमा नाही, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.
