B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण

Sep 01, 2020, 14:22 PM IST
1/5

B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण

टेलिव्हिजन विश्वातील आघाडीच्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेता राम कपूर याचंही नाव घेण्यात येतं. चित्रपटांमधूनही रामचा अभिनय प्रेक्षकांना पाहता आला आहे. पण, त्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे छोट्या पडद्यामुळं अर्थात मालिका विश्वामुळं. राम कपूर हा त्याचं मानधन, अभिनय, भूमिका यांसोबतच गेल्या काही वर्षांमध्ये विशेष लक्ष वेधून गेला ते म्हणजे त्याच्या फिटनेसमुळं. 

2/5

B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण

एकेकाळी स्थुल शरीरयष्ठी असणाऱ्या रामनं एकाएकी सोशल मीडियावर त्याचे 'फॅट टू फिट' असे फोटो शेअर केले होते. ज्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

3/5

B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण

रामनं एक - दोन नव्हे तर तब्बल 30 किलो वजन कमी करत आरोग्यदायी राहणीमानाचा मार्ग अवलंबला. 

4/5

B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण

वजन कमी झाल्यानंतर राममध्ये बरेच बदलही दिसून आले. मुख्य म्हणजे त्याचं वयही कमी दिसून येऊ लागलं.   

5/5

B'Day: राम कपूरचं हे रुप पाहून चाहतेही झालेले हैराण

खाण्याच्या सवयींवर ताबा ठेवत आणि योग्य तो व्यायाम करत रामनं वजन घटवलं होतं. यादरम्यान, रामला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. ज्यासाठी त्याला भुकेवरही ताबा ठेवावा लागत होता. अतिशय जिद्दीनं आणि चिकाटीनं रामनं हा टप्पा गाठला होता.