Black Rice Totke: चांगली नोकरी आणि अडकलेली कामे लागतील मार्गी, काळ्या तांदळाचे हे आहेत प्रभावी उपाय

Black Rice Remedies: जर तुम्ही खूप दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहात आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे.   

Jan 11, 2023, 15:29 PM IST
1/5

तुम्हाला आर्थिक स्थिती चांगली करायची असेल तर कोणत्याही विहिरीत काळ्या तांदळाचे दाणे टाका. त्यामुळे तुम्हाला धन आणि लाभाचे योग तयार होतील.  तसेच व्यवसायात प्रचंड नफा देखील होईल.  

2/5

जर तुम्ही खूप दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहात आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल. तर दर  शनिवारी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलात काळे तांदूळ मिसळून शनिदेवाला अर्पण करा. तसेच शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुम्हाला चांगली नोकरीची संधी नक्कीच मिळेल.

3/5

जर तुमचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसेल किंवा तुम्हाला मूल होण्याची इच्छा असेल तर पिंपळाच्या झाडावर काळ्या तांदळाचे पाणी अर्पण करा. याशिवाय पिंपळाच्या झाडाखाली तेलाच्या दिव्यात काळे तांदूळ ठेवून शनिवारी जाळावे. असे केल्याने तुमची संतान होण्याची इच्छा लवकर पूर्ण होईल आणि वैवाहिक जीवन सुखी होईल. 

4/5

जर तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असेल आणि त्या आजारापासून मुक्ती मिळवायची असेल, तर सोमवारी काळ्या तांदळात दूध आणि पाणी मिसळून भगवान शंकराला अर्पण करा. याशिवाय भगवान शंकराला मिठाई अर्पण करा. असे केल्याने दीर्घकाळ चालणारा आजार लवकर बरा होतो.

5/5

वैवाहिक जीवनात सुखासाठी काळ्या तांदळाचे उपायही करता येतात. वैवाहिक जीवनात अनेकदा कलहाची परिस्थिती निर्माण होते. जोडीदारासोबत अनेक मुद्द्यावरून मतभेद होत असतात. त्यावेळी काळे तांदूळ पाण्यात टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)