#FatToFit : नव्या रुपात राम कपूर 'बडे अच्छे लगते है'

Jul 10, 2019, 09:55 AM IST
1/6

#FatToFit : नव्या रुपात राम कपूर 'बडे अच्छे लगते है'

'बडे अच्छे लगते है...' या मालिकेतून उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता राम कपूर अनेक़ांच्याच पसंतीचा. फक्त हीच मालिका नव्हे, तर रामने इतरही विविध मालिका आणि काही चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. असा हा राम कपूर बऱ्याच दिवसांनी प्रकाशझोतात आला आहे, ते म्हणजे सोशल मीडियावरील त्याच्या काही फोटोंमुळे. (छाया सौजन्य- राम कपूर/ इन्स्टाग्राम)

2/6

#FatToFit : नव्या रुपात राम कपूर 'बडे अच्छे लगते है'

'काय म्हणता.... खूप दिवसांनंतर भेटतोय....' असं म्हणत रामने त्याचे काही फोटो सर्वांच्या भेटीला आले. हे फोटो पाहताच अनेकजण थक्क झाले.  (छाया सौजन्य- राम कपूर/ इन्स्टाग्राम)

3/6

#FatToFit : नव्या रुपात राम कपूर 'बडे अच्छे लगते है'

राम तसा प्रेक्षकांसाठी नवा नाही. पण, त्याचा हा लूक मात्र सर्वांसाठीच काहीसा अनपेक्षित आणि तितकाच नवा होता.  (छाया सौजन्य- राम कपूर/ इन्स्टाग्राम)

4/6

#FatToFit : नव्या रुपात राम कपूर 'बडे अच्छे लगते है'

चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असणाऱ्या या अभिनेत्याने स्वत:च्या शारीरिक सुदृढतेला महत्त्व देत स्थुलता कमी करण्याचं अगदी मनावर घेतल्याचं या फोटोंमधून लक्षात येत आहे.  (छाया सौजन्य- राम कपूर/ इन्स्टाग्राम)

5/6

#FatToFit : नव्या रुपात राम कपूर 'बडे अच्छे लगते है'

#FatToFit असेच त्याचे हे फोटो आधीचा राम आणि आताचा राम यांतील फरक स्पष्ट करत आहेत.  (छाया सौजन्य- राम कपूर/ इन्स्टाग्राम)

6/6

#FatToFit : नव्या रुपात राम कपूर 'बडे अच्छे लगते है'

कलाविश्वात काम करत असतेवेळी व्यग्र वेळापत्रक, जेवणाच्या अनियमित वेळा, अपूर्ण झोप या साऱ्याचे परिणाम अनेकदा शरीरावर होतात. परिणामी स्थुलता, मधुमेह यांसारख्या समस्या उदभवतात. पण, वेळीच गोष्टी सुधारल्या असता त्यांचे सकारात्मक परिणामच आपल्याला पाहायला मिळतात. खुद्द राम कपूरही या तत्वाशी सहमत असेल यात वाद नाही.  (छाया सौजन्य- राम कपूर/ इन्स्टाग्राम)