Bollywood Holi 2023 Photos: बॉलिवूड कलाकारांनी खेळली होळी, रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?

Bollywood Holi 2023 Celebration Photos:  संपूर्ण भारत होळीचा सण जल्लोषात साजरा केला. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजर केला. बॉलिवूड आणि होळाचं गहिरं नातं आहे. रंगीबेरंगी गुलालात तल्लीन झालेल्या लोकांचे चेहरे इंद्रधनुष्यासारखे दिसतात. होळी हा रंगांचा सण आणि अशा प्रसंगी लोक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. प्रत्येक भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतिने खेळला जातो. कुठे रंगपचंमी तर कुठे धुलिवंदन. सर्व सामान्याबरोबरचं बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतचे स्टार्सही थाटामाटात होळी साजरी करतात. बॉलिवूड कलाकारांचे रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?  

Mar 08, 2023, 12:30 PM IST
1/9

विकी कौशल आणि कतरिना कैफने आपल्या कुटुंबासोबत होळीचा सण साजरा केला. विकी कौशलचे आई-वडील आणि कतरिना कैफ यांच्यासोबत होळी साजरी करत विक्की कौशलने कॅप्शन दिले आहे की, आपल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा.   

2/9

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. कियाराने काही फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शन दिले आहे की, तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा.   

3/9

करिश्मा कपूरने तिच्या घराच्या बाल्कनीत होळी खेळली. काही फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा… 

4/9

करीना कपूर खानने तिचे मुले तैमूर आणि जेहसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शन दिले की, होळीची मी वाट पाहू शकत नाही, हा माझ्यासाठी सर्वोत्तम होळी सण आहे. मी तुला मिस करत आहे सैफू. रंग पसरवा, प्रेम पसरवा आणि सर्वजण आनंदी रहा.

5/9

अभिनेता चंकी पांडेनेही होळीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हॅप्पी हॅपी होली असे कॅप्शन दिले. माझ्या आयुष्यात अनेक सुंदर रंग आहेत. 

6/9

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने तिचा नवरा आणि मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिघेही खूप रंगतदार दिसत आहेत. तिने कॅप्शनमध्ये हॅप्पी होली असे लिहिले आहे... 

7/9

अभिनेत्री सनी लिओनीने काही फोटो शेअर केले आहेत. तिने होळीनिमित्त कॅप्शन दिले की हॅप्पी होली पार्ट 1, या फोटोमध्ये सनी लिओन आणि पती आणि तिन्ही मुलांसोबत दिसत आहे. सनी लिओनची फॅमिली खूपच सुंदर दिसत आहे. 

8/9

वरुण धवनने त्याच्या बद्री की दुल्हनिया या चित्रपटातील व्हिडिओची क्लिप शेअर केली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने हॅप्पी होली असे लिहिले आहे आणि त्यासोबत त्याने स्वतःच्या चित्रपटातील एक गाणे टाकले आहे.  

9/9

तापसी पन्नूने एक फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा, रंगीबेरंगी रहा, गोंडस रहा आणि उत्कृष्ट रहा. या फोटोमध्ये तापसीचा चेहरा रंगवण्यात आला असून ती खूपच क्यूट दिसत आहे.