काडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?
आपल्याकडे एक म्हण आहे, 'लग्न करावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए' म्हणजेच लग्न केलं नाही केलं आणि केलं तरी पश्चाताप हा होतोच. पण लग्नानंतर घटस्फोट हा असा मुद्दा असतो की कोणाला घ्यायचे नसते, पण आयुष्यात परिस्थिती अशी होते की लोक इच्छा नसतानाही वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि हे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद आणि धाडस लागते. आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराशी घटस्फोट घेतल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला.

1.पूजा भट्ट : अभिनेत्री पूजा आजकाल बिग बॉस ओटीटी 2 चा भाग आहे. ती शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत आहे. या अभिनेत्रीने 2003 मध्ये 24 ऑगस्ट रोजी लग्न केले होते. तिचे लग्न मनीष नावाच्या व्यक्तीशी झाले होते. पूजाचे पती हे मीडिया जगतात नावाजलेले व्यक्ती आहेत. दोघांमधील प्रेम संपुष्टात आल्याने त्यांचे लग्न 11 वर्षांनंतर मोडले.


