1/5
यश मिळवायचं आहे तर, 'या' सवयी टाळा
यश संपादन करणं हे एकमात्र असं ध्येय आहे जे गाठण्यासाठीच जणू अनेकजण विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला झोकून देत काम करत असता, नव्या संकल्पनांच्या जोडीने प्रगतीपथावर चालत असतात. पण यामध्ये कित्येकदा असं होतं की काही गोष्टींमुळे अमुक एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठिण होऊन बसतं किंवा काही गोष्टी आपलं लक्ष विचलीत करतात. मग त्यामध्ये तुमच्या आवडत्या गोष्टीपासून तुमच्या छंदांचाही समावेश आहे.
2/5
यश मिळवायचं आहे तर, 'या' सवयी टाळा
वॉरन बफेट आणि बिल गेट्स यांनीही यशाचे असे सिद्धांत मांडले ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी प्रकर्षाने टाळल्या. ज्या कृतींचा तुमच्या यशामध्ये काहीही उपयोग होत नाही त्या गोष्टी टाळण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. खुद्द बफेट म्हणाले होते, तुम्ही एकमेव गोष्ट विकत घेऊ शकत नाही. ती म्हणजे वेळ. लक्ष आणि एकाग्रता विचलीत करणाऱ्या वाटाच त्यांनी हेतूपुर्वक टाळल्या. ज्या कारणास्तव त्यांच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरलाही स्थान दिलं नाही. एकिकडे बफेट यांनी हा मार्ग निवडलेला असतानाच बिल गेट्स यांनीही त्यांच्या आवडींपासून कायमचा दुरावा पत्करला होता.
3/5
यश मिळवायचं आहे तर, 'या' सवयी टाळा
ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी स्वत: याविषयीची माहिती दिली होती. गाणी ऐकणं आणि टीव्ही पाहणं याकडे त्यांनी वयाच्या २०व्या वर्षीच सोडलं होतं. हे सारं अतिशयोक्ती वाटेल. पण, मी हा मार्ग निवडला कारण, या गोष्टी एका सॉफ्टवेअरविषयीच्या कल्पनांपासून माझं लक्ष विचलीत करत होत्या. हा विचारही अनेकदा आपल्या डोक्यातही येत नाही.
4/5
यश मिळवायचं आहे तर, 'या' सवयी टाळा
यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळी खेळणं, गाणी वगैरे ऐकणं यांपासून, छंदांपासून दूरच रहावं असं नाही हेच पुढे बफेट यांच्या एका कृतीने सिद्ध केलं. 'ब्रीज' हा त्यांचा आवडता खेळ खेळण्यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. मुळात विविध कल्पना आणि परिणामी सकारात्मक कल्पना देणारा हा खेळ एक प्रकारचा बौद्धीक व्यायामच आहे, असंच त्यांचं म्हणणं.
5/5