5000 रुपये महिना....एक करोड तरुणांना कसे मिळणार? अर्थमंत्र्यांनी केला खुलासा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यांनी अर्थसंकल्पात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.   

Jul 26, 2024, 16:21 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यांनी अर्थसंकल्पात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. 

1/10

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यांनी अर्थसंकल्पात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.   

2/10

देशातील 500 टॉप कंपन्यांमध्ये या तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल. ही इंटर्नशिप 12 महिन्यांची असेल.   

3/10

या तरुणांना नवीन कौशल्य शिकवलं जाईल आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही दिलं जाईल.   

4/10

इंटर्नशिपसाठी 21 ते 24 वर्षांचे तरुण अर्ज करु शकतात. अर्जदार पूर्णवेळ नोकरी करणारा किंवा विद्यार्थी नसावा अशी अट आहे.   

5/10

IIT, IIM, IISER, CA, CMA सारख्या संस्थांमधील पात्र उमेदवारही अर्ज करु शकत नाहीत.   

6/10

इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसायला हवा.   

7/10

तरुणांना इंटर्नशिप अलाऊन्स म्हणून 5000 रुपये दिले जातील. याशिवाय 6 हजारांचा वनटाइम अलाऊन्सही दिला जाईल.   

8/10

तरुणांना सरकारकडून दर महिन्याला 5 हजार रुपये दिले जातील असं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं आहे.   

9/10

अनेक कंपन्या आपलं कर्मचारी बळ वाढवत असताना 1 कोटी तरुणांना 5 वर्षात इंटर्नशिप मिळणं फार सोपं होईल असा त्यांचा दावा आहे.   

10/10

सरकार कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहे. आम्ही सर्व तयारी करुनच ही योजना आणली आहे. इंटर्नशिप नंतर कौशल्याच्या आधारे चांगली नोकरी मिळेल असं त्या म्हणाल्या आहेत.