Budget 2024: पगारवाढ, पेन्शन अन्... यंदाच्या बजेटकडून असलेल्या 8 अपेक्षा

Budget 2024 : तुमच्या वाट्याला काय येणार, कोणाची चांदी होणार? अर्थमंत्री कोणावर प्रसन्न होणार? पाहा अर्थसंकल्पासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. 

Jan 31, 2024, 10:19 AM IST

Budget 2024 : यंदाच्या वर्षी सादर होणारा अर्थसंकल्प सर्वतोपरी महत्त्वाचा असणार आहे. कारण, हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरीही त्या माध्यमातून समाजातील मोठ्या वर्गावर छाप पाडण्याचा प्रयत्न मोदी सरकार करताना दिसणार आहे. 

1/7

अर्थसंकल्प

Budget 2024 what are the expectations for salaried people Nirmala Sitharaman latest updates

Budget 2024 : परिणामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यंदा नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि अनेकांनाच फायदा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहिला मुद्दा अर्थसंकल्पाकडून नेमक्या काय अपेक्षा ठेवायच्या, तर तेसुद्धा पाहा....   

2/7

कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि आठवा वेतन आयोग

Budget 2024 what are the expectations for salaried people Nirmala Sitharaman latest updates

गेल्या कैक दिवसांपासून अनेक केंद्रीय कर्मचारी त्यांच्या वेतन प्रणालीमध्ये पुनर्रचनेबाबतची मागणी करताना दिसले होते. परिणामी या कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊन ही रक्कम 18 हजारांवरून 26 हजारांवर पोहोचू शकते. आठव्या वेतन आयोगासंबंधीसुद्धा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

3/7

महागाई भत्ता

Budget 2024 what are the expectations for salaried people Nirmala Sitharaman latest updates

सहसा जानेवारी आणि जुलै महिन्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो. कोरोना काळात मात्र ही वाढ न झाल्यामुळं आता 18 महिन्यांची थकबाकी रक्कम आणि त्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो.   

4/7

दुहेरी करातून दिलासा

Budget 2024 what are the expectations for salaried people Nirmala Sitharaman latest updates

कंपन्यांकडून मिळणाऱ्या नफ्यावर कर भरला जातो. पण, शेअरधारकांसाठी ही अट लाभांशावरील रकमेवर लागू असते. परिणामी या दुहेरी करातून आता शेअरधारकांची सुटका होऊ शकते.    

5/7

शेतकरी सन्मान निधीत वाढ

Budget 2024 what are the expectations for salaried people Nirmala Sitharaman latest updates

आगामी निवडणुका आणि मोठा मतदारवर्ग लक्षात घेता आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम 6 हजारांवरून 9 हजारांवर आणली जाऊ शकते.   

6/7

ज्येष्ठ नागरिकांना कोणता दिलासा?

Budget 2024 what are the expectations for salaried people Nirmala Sitharaman latest updates

ज्येष्ठ आणि निवृत्त नागरितांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत त्यासाठीचा खर्च पाहता तिथं सरकार दिलासा देऊ शकतं. राष्ट्रीय पेन्शन योजनेतून एन्युटींना करमुक्त ठरवलं जाऊ शकतं.   

7/7

अटल पेन्शन

Budget 2024 what are the expectations for salaried people Nirmala Sitharaman latest updates

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्तीवेतनाची मर्यादा वाढवू शकते. सध्याची रक्कम कमी असल्यामुळं सरकार हा निर्णय घेऊ शकतं. शिवाय, सध्याच्या घडीला देशातील वित्तीय तूट 5.90 टक्के इतकी आहे. चालू वर्षात म्हणजेच 2024 च्या अखेरीस हा आकडा 4.50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवला जाऊ शकतो.