Budget 2024 : अर्थसंकल्प कोण तयार करतं? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच अतिशय रंजक माहिती समोर आली आहे.   

Jan 29, 2024, 15:25 PM IST

Budget 2024 : देशात नव्यानं सत्तास्थापनेची गणित सोडवण्यासाठी राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी सुरु असताना चालू आर्थिक वर्ष संपताना आणि नवं आर्थिक वर्ष सुरु होणापूर्वी आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाची. 

1/7

विविध योजना

Budget 2024 Who Makes The Indian Budget Know The Process In Details

Budget 2024 : देशभरात विविध योजना, क्षेत्र आणि विभागांसह विविध राज्यांचा विकास केंद्रस्थानी ठेवत त्यासाठी वर्षभराच्या अनुषंगानं काही आर्थिक तरतुदी करण्यात येतात. 

2/7

अर्थसंकल्प

Budget 2024 Who Makes The Indian Budget Know The Process In Details

Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होत असताना या खर्चांबाबतचा सविस्तर तपशील सभागृहापुढं आणि पर्यायानं संपूर्ण देशापुढं मांडला जातो. असा हा अर्थसंकल्प नेमकं कोण तयार करतं तुम्हाला ठाऊक आहे? 

3/7

कैक दिवसांपूर्वी सुरु होते तयारी...

Budget 2024 Who Makes The Indian Budget Know The Process In Details

1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाआधी अनेक दिवसांपासून त्याची तयारी केली जाते. देशासाठी वर्षभरात नेमका किती खर्च होणं अपेक्षित आहे याचा लेखाजोथा तिथं असतो. याच अर्थसंकल्पाच्या धर्तीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही त्यांच्या सल्लागारांशी विशेष चर्चा केली आहे. 

4/7

अर्थसंकल्पाची ब्लू प्रिंट

Budget 2024 Who Makes The Indian Budget Know The Process In Details

अर्थमंत्रालयासोबतच्या अतीव महत्त्वाच्या चर्चेनंतर अर्थसंकल्पाची ब्लू प्रिंट काढली जाते. या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांच्या नजरा करप्रणालीकडेच असतात. मुळात अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी अर्थमंत्रालयाची असते. 

5/7

आर्थिक वर्षातील गरजा

Budget 2024 Who Makes The Indian Budget Know The Process In Details

अर्थसंकल्प तयार करण्याआधी सर्व सदस्यांकडे विचारणा केली जाते. येत्या आर्थिक वर्षातील गरजा पाहून आर्थिक तरतुदींवर चर्चा केली जाते. संपूर्ण देशाला केंद्रस्थानी ठेवत या मंत्रालयातील अधिकारी आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करतात. 

6/7

निती आयोगाशी चर्चा

Budget 2024 Who Makes The Indian Budget Know The Process In Details

पुढे निती आयोगाशी अर्थसंकल्पाबाबतची चर्चा केली जाते. सरतेशेवटी आर्थिक गरजा आणि खर्चाची माहिती अर्थमंत्रालयाकडे येते. अर्थमंत्रालयाकडून अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी तज्ज्ञांचाही सल्ला घेतला जातो. 

7/7

अर्थमंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

Budget 2024 Who Makes The Indian Budget Know The Process In Details

अनुमानित रकमेवर अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून चर्चा केली जाते. ज्यानंतर अर्थ मंत्रालयच या रकमेत वाढ किंवा घट करून अर्थसंकल्प निर्धारित करतं.