'या' 10 देशांत अर्ध्याहून अधिक कमाई इन्कम टॅक्समध्ये जाते! 57.30% Income Tax घेणारा देश कोणता?

Top 10 Countries In World With Highest Income Tax: दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटमध्ये आयकर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. भारतात 0 ते 30 टक्के कर आकारला जातो. मात्र काही देशांमध्ये कमाईच्या अर्ध्याहून अधिक रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते. बजेटच्या पार्श्वभूमीवर पाहूयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील देश कोणते आहेत. 

Swapnil Ghangale | Jan 30, 2025, 10:30 AM IST
1/12

mostincometax

जगातील एका देशात नागरिक अगदी आनंदाने 57.30 टक्के आयकर भरतात. यामागील कारणही तसं खास आहे. जाणून घेऊयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील 10 देश कोणते याबद्दल...

2/12

mostincometax

देशाचं बजेट म्हटल्यानंतर सर्वसामान्यांना सर्वात जिव्हाळ्याचा वाटणारा विषय म्हणजे आयकर! दरवर्षी आयकर रचनेमध्ये काय बदल होतो याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. भारतात आयकर वेगवेगळ्या टक्केवारीत द्यावा लागतो. मात्र तुम्हाला आज अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे आयकर हा 50 टक्क्यांहून अधिक आहे. 

3/12

mostincometax

नेदरलॅण्ड्स - सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर या देशातील आयकर 46.5 टक्के इतका आहे. येथील अनिवासी नागरिकांकडून ठराविक माध्यमातून केलेल्या कमाईवरच आयकर आकारला जातो. पण नागरिकांना संपूर्ण कमाईवर कर भरावा लागतो.  

4/12

mostincometax

स्लोव्हेनिया - सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या या देशामध्ये वैयक्तिक आयकर 50 टक्के इतका आहे. युरोपमधील सर्वात छोट्या देशांपैकी एक असलेला हा देश आपल्या नागरिकांना चांगल्या सार्वजनिक सुविधा देण्याच्या मोबदल्यात इतका कर आकारतो  

5/12

mostincometax

इस्रायल - या यादीमध्ये आठव्या स्थानी भारताचा मित्र देश असलेल्या इस्रायलचा समावेश आहे. इस्रायलमध्ये 50 टक्के आयकर आकारला जातो. हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. येथील तेल अविव या शहरातील विकासाच्या मॉडेलवरुनच भारतात स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आलेली.  

6/12

mostincometax

बेल्जियम - सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांमध्ये बेल्जियम सातव्या स्थानी असून येथे कमाईच्या अर्धी रक्कम म्हणजेच 50 टक्के रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते. सामाजिक विकासाची कामं या करांमधून केली जातात.  

7/12

mostincometax

अरुबा - कॅरेबियन समुद्रामधील या छोट्याश्या बेटवजा देशामध्ये 52 टक्के आयकर आकारला जातो. हा देश सर्वात सुरक्षित देशांपैकी एक आहे कारण येथील बहुतांश लोक हे उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सधन आहेत. सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत अरुबा देश सहाव्या स्थानी आहे.  

8/12

mostincometax

स्वीडन - स्वीडनमधील 52.3 टक्के आयकर आकारला जातो. हा देश सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. स्कॅण्डवेनियन देशांमध्ये अधिक आयकर आकारला जाण्यामागील मुख्य कारण म्हणजे येथील सार्वजनिक क्षेत्रातील सेवा मोफत दिल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा आणि उच्च शिक्षणाचा समावेश होतो. स्वीडन हा असाच एक देश आहे.  

9/12

mostincometax

ऑस्ट्रिया - सर्वाधिक आयकर आकारल्या जाणाऱ्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर या देशामध्ये खासगी आयकर हा 55 टक्के इतका आहे. येथे या मोबदल्यात अनेक सेवा मोफत दिल्या जातात. ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प करामधूनच उभारले जातात.   

10/12

mostincometax

डेन्मार्क - या युरोपीयन देशामध्ये आयकर 55.90 टक्के इतका आहे. येथे अनेक सार्वजनिक सुविधा मोफत दिल्या जातात. जास्त पगार देण्यासाठी जास्त कर आकारला जातो असं सांगितलं जातं. हा देश सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.  

11/12

mostincometax

जपान - सर्वात प्रगत देशांपैकी एक असलेल्या जपानमध्ये 55.95 टक्के आयकर आकारला जात असून तो जगातील सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकांवर आहे. येथे अधिक कमवणाऱ्यांकडून अधिक आयकर घेण्याची पद्धतही आहे.

12/12

mostincometax

फिनलँड - जगात सर्वाधिक आयकर आकारणारा देश फिनलँड आहे. या देशातील आयकर तब्बल 57.30 टक्के इतका आहे. म्हणजेच प्रत्येक कमवलेल्या 100 रुपयांपैकी केवळ 42.70 रुपयेच नागरिकांना मिळतात. मात्र या देशात अनेक सर्वाजनिक सुविधा मोफत देण्यात येतात. यामध्ये अगदी आरोग्य सेवेपासून ते शिक्षणापर्यंत अनेक सवलती आहेत. म्हणूनच 57.30 टक्के आयकर असला तरी लोक तो आनंदाने भरतात.