महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही होतो स्तनाचा कर्करोग, काय आहेत लक्षणे?

Breast Cancer in Men : भारतीय महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते तितकीच पुरुषांमध्ये ही असते. हा आजार दुर्मिळ जरी असला तरी, पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पुरुषांचे स्तन महिलांसारखे पूर्णपणे विकसित होत नाहीत, परंतु सर्व पुरुषांना स्तनाच्या ऊती असतात.

Jun 14, 2023, 17:04 PM IST
1/6

Breast Cancer in Men

स्तनाचा कर्करोग सामान्यतः महिलांमध्ये दिसून येतो. असे असले तरी पुरुषांनाही हा आजार होतो. परंतु त्याचे प्रमाण फारच कमी आहे. याचे कारण म्हणजे पुरुषांचे स्तन हे स्त्रियांच्या स्तनांइतके पूर्ण विकसित झालेले नसतात. 

2/6

Breast Cancer in Men

जगातील केवळ 1 टक्के पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळतो. 2015 मध्ये या संदर्भात सुमारे 2350 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. सुमारे 440 पुरुषांना स्तनाच्या कर्करोगाने आपला जीव गमवावा लागला.

3/6

Breast Cancer in Men

अंडकोषांवर सूज येणे हे देखील पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढण्यास कारणीभूत आहे. तसेच अंडकोष शस्त्रक्रियेने काढून टाकल्याने देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.

4/6

Breast Cancer in Men

तरुणांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. वय वाढलं की धोका वाढत जातो. स्तनाचा कर्करोग हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एखाद्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

5/6

Breast Cancer in Men

क्लाइनफेल्टर सिंड्रोम नावाची अनुवांशिक स्थिती असलेल्या पुरुषांना देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो. 

6/6

Breast Cancer in Men

पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे महिलांसारखीच असतात. स्तनात गाठ तयार होते.  स्तनात गाठ जाणवणे, एका स्तनाचा आकार वाढणे, स्तनाग्र दुखणे, स्तनाग्रवर फोड येणे, उलटे स्तनाग्र, वरील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वैद्यकीय सल्ला घ्या.    (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)