'कुछ तो गड़बड़ है दया', अमिताभ बच्चन की TRP? 'या' कारणामुळे 20 वर्षांनंतर अचानक बंद झाला CID शो

1998 मध्ये सुरु झालेल्या CID या टीव्ही शोने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केलं. मात्र, आता हा शो अचानक बंद झाला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

| Oct 08, 2024, 15:17 PM IST
1/8

अचानक बंद

सोनी वाहिनीवर येणारा CID हा शो 1998 पासून सुरु झाला आहे. 2018 पर्यंत या शोने 20 वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केले आणि अचानक बंद झाला. 

2/8

प्रेक्षक नाराज

CID बंद झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. छोट्या पडद्यावरील एकता कपूरचा शोच नाही तर इतर अनेक मालिकांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र, अचानक CID बंद का करण्यात आले याचे कारण अद्याप कोणालाही समजले नाही. 

3/8

CID बंद होण्याचे कारण

शोच्या कथेसोबतच यात दिसलेल्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते. मग तो दया असो किंवा अभिजीत. आता वर्षांनंतर CID या शोमधील एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांनी CID बंद होण्यामागील कारण सांगितले आहे. 

4/8

केबीसीमुळे सीआयडी शो बंद?

'काहीतरी गडबड आहे दया' या डायलॉगमुळे प्रचंड प्रसिद्ध झालेले एसीपी प्रद्युमन हे प्रत्येक व्यक्तीच्या मनात राहिले. आता त्यांनी फ्रायडे टॉकीजसोबत बोलताना या शोबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. 

5/8

TRP मध्ये आमने सामने

एसीपी प्रद्युमन म्हणजेच शिवाजी यांनी सांगितले की, आम्ही वाहिनीला विचारायचो की त्यांनी CID हा शो बंद का करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये आम्ही TRP मध्ये आमने-सामने होतो.

6/8

TRP मध्ये घसरण

शोच्या TRPमध्ये थोडीशी घसरण झाली होती. मात्र, कोणत्या शोच्या TRPमध्ये घट होत नाही. त्यांनी शो बंद करण्यापूर्वी त्याच्या वेळापत्रकात छेडछाड केली. पूर्वी हो शो रात्री 10 वाजता प्रसारित होत होता. पण नंतर ते रात्री 10.30 वाजता किंवा 10.45 वाजताही प्रसारित होऊ लागला. यामुळे प्रेक्षकांनी या शोकडे पाठ फिरवली. 

7/8

निर्माते आणि वाहिनीमध्ये मतभेद?

CID शो बंद करण्यामागे निर्माते आणि चॅनलमधील मतभेद देखील असू शकतो. असे संकेतही शिवाजी पाटम यांनी दिले. कदाचित त्यांना निर्मात्यांशी समस्या आहे. त्यामुळे त्यांनी वेळ बदलण्याची इच्छा आहे. परंतु आमच्यासाठी ते केवळ निष्ठेबद्दल नव्हते. ही सुद्धा मैत्रीत होती. आम्ही एकत्र वाढलो आणि आम्ही एक संघ होतो. 

8/8

CID मधील कलाकार

बी.पी. सिंग दिग्दर्शित या शोमध्ये आदित्य श्रीवास्तव यांनी अभिजीतची भूमिका, दयानंद शेट्टी यांनी दया, दिनेश फडणीस यांनी फ्रेडरिकची भूमिका तर नरेंद्र गुप्ता यांनी डॉ. साळुंखे यांची भूमिका साकारली होती.