पाळण्यापासून पाण्यापर्यंत अन् नोकरीपासून घरांपर्यंत... इरशाळवाडीवासियांना CM भेटले तेव्हा काय काय घडलं? पाहा Photos

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारलेल्या तत्पुरत्या निवारा सोयीची पहाणी केली. यावेळीस मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी केली. तसेच त्यांनी इरशालवाडीमधील विस्थापित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अगदी रोजगारापासून ते नवीन घरांपर्यंतची सविस्तर माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनाग्रस्तांना दिली. पाहूयात या भेटीदरम्यानचे फोटो...

| Aug 16, 2023, 08:49 AM IST
1/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी खालापूर तालुक्यामधील हातनोली येथील डायमंड पेट्रोलपंपाजवळ तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनी पहाणी केली.

2/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेमध्ये 144 आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. या आपद्ग्रस्तांनीही स्वातंत्र्यदिन साजरा केला.

3/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

काही घरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आपद्ग्रस्तांच्या समस्या, अडचणी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. या घरांमध्ये अगदी पाळण्यासारख्या लहान गोष्टींपासून रोजच्या वापराच्या गोष्टींपर्यंतच सर्वच गोष्टींची सोय करण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या घराच्या आतील फोटोंमधून दिसत आहे.

4/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

मुख्यमंत्र्यांनी सर्वच आपद्ग्रस्तांना धीर दिला. शासन भक्कमपणे तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

5/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

या ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्यापासून शौचालयांपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था 6 महिन्यात होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपद्ग्रस्तांना दिला. सिडकोमार्फत ही कामे करण्यात येणार असून आराखडा अंतिम झाल्यावर तो ग्रामस्थांना दाखविण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

6/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

इरशाळवाडी दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या घरांची पाहणी करत असताना मुख्यमंत्री शिंदेंना एका घरात एक लहानगी अभ्यास करत असताना दिसली. या मुलीशी संवाद साधत “खूप अभ्यास कर मोठी हो…” असे सांगताना मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवून मुख्यमंत्र्यांनी तिला आशीर्वाद दिला.

7/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

शिक्षित व उच्च शिक्षित पात्र युवकांना शासकीय नोकरी देण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार यासाठी विशेष बाब म्हणून सवलत देण्यात येईल. सर्वांना रोजगार देण्यासाठी नोकरी अथवा व्यवसाय संधी देण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

8/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनेतर्गत बचतगटाच्या माध्यमातून प्रत्येक गटास साडेसात लाख रुपये प्रमाणे व्यवसायासाठी मदत देण्यात येईल. तसेच बँक खाते देखील उघडण्यास मदत केली जाईल असे ही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मिठाई वाटून स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केला.

9/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

या कुटुंबाना शेतीसाठी शासकीय जमीन देण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच निर्णय घेण्यात येईल, हे सांगतानाच ज्येष्ठ,  विधवा, अनाथ महिलांना पेन्शन लागू केली जाईल. मुख्यमंत्री म्हणून आणि मी व्यक्तिशः सोबत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

10/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

गेल्या महिन्यात 20 जुलैला इरशाळवाडीमध्ये डोंगरकडा खचल्याने मोठी दुर्घटना झाली होती. यात जवळजवळ संपूर्ण गाव दरडीखाली गाडलं गेलं. याच गावातील नागरिकांना पुरवलेल्या सुविधांची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री तात्पुरता निवारा पुरवलेल्या ठिकाणी गेले होते.

11/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

या दुर्घटनेमधून बचावलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याठिकाणी करण्यात आली आहे.

12/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

सुमारे 42 कंटेरनरमध्ये या नागरिकांची सोय करण्यात आली आहे. शिवाय अन्य 10 कंटेनरमध्ये दवाखाना, अंगणवाडी, पोलिस नियंत्रण कक्ष, आपत्कालिन नियंत्रण कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

13/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

ज्या दिवशी इरशाळवाडी दुर्घटना घडली त्यादिवशी मुख्यमंत्री शिंदे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देखील दिवसभर त्याठिकाणी तळ ठोकून होते. मदत आणि बचावकार्यासाठी मुख्यमंत्री आवश्यक त्या सूचना देत होते. एवढेच नाही तर प्रतिकुल परिस्थितीतही भर पावसात मुख्यमंत्री शिंदे 4 तासांची पायपीट करून इर्शाळगडाजवळ जाऊन आले आणि दुर्घटनास्थळाची तसेच बचावकार्याची पाहणी करून आले. या घटनेला महिना होण्याच्या आतच 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पुन्हा इरशाळवाडीवासियांच्या भेटीसाठी गेले होते. 

14/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

इरशाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या अनाथ मुलांची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊन्डेशनने घेतली आहे.

15/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

आपद्ग्रस्त युवक आणि महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. आपद्ग्रस्तांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले.

16/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपदग्रस्ताना खेळणी,खाऊ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

17/17

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit

खासदार श्रीरंग बारणे आणि डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार  सर्वश्री महेश बालदी, महेंद्र थोरवे, भरत गोगावले, शांताराम मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.