उद्या शाळा बंद! 'या' कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय; ट्विट करत केजरीवाल म्हणतात...

CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुसळधार पावसामुळे शहरात पाणी तुंबणे, घरे कोसळणे आणि झाडे पडणे यामुळे शाळा बंद (Delhi schools to remain closed) करण्याचे आदेश दिले आहेत. 

Jul 09, 2023, 22:20 PM IST

CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुसळधार पावसामुळे शहरात पाणी तुंबणे, घरे कोसळणे आणि झाडे पडणे यामुळे शाळा बंद (Delhi schools to remain closed) करण्याचे आदेश दिले आहेत. 

1/5

दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याचा इशारा पाहता दिल्लीतील सर्व शाळा उद्या एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

2/5

शाळांच्या तपासणीदरम्यान कोणतीही कमतरता किंवा समस्या आढळून आल्यास ती तातडीने दूर करण्यात यावी, असे आदेश शिक्षणमंत्री अतिशी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

3/5

सोमवारी पुन्हा हवामानाची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

4/5

दिल्लीसह उत्तर आणि पश्चिम भारतात पुढील 2 दिवस अतिमुसळधार पाऊस पडेल, त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

5/5

दरम्यान, दिल्लीच्या बहुतांश ठिकाणी आणि लगतच्या भागात गडगडाटासह हलक्या ते मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.