16 वर्षांखालील मुलांसाठी कोचिंग क्लासेस बंद, उल्लंघन केल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा
Coachin Classes : खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं नव्या गाईडलाईन्स जारी केल्यात. 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळणार नाही, असा नवा नियम केंद्र सरकारनं केलाय.. याचाच अर्थ दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता खासगी कोचिंग क्लासेस चालवता येणार नाहीत... एवढंच नव्हे तर विद्यार्थी आणि पालकाकंडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही.