योगायोग की....! पॅट कमिंसची हॅटट्रिक टीम इंडियाला जिंकवून देणार वर्ल्डकप? 'या' आकड्यांनी समजून घ्या कारण

Pat Cummins: ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी बांगलादेशाचा पराभव करत वर्ल्डकपमधील सुपर 8 च्या टप्प्याची चांगली सुरुवात केली. या सामन्यात हिरो ठरला तो हॅटट्रिक घेणारा पॅट कमिंस. 

| Jun 22, 2024, 11:05 AM IST
1/7

बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात कमिंसच्या हॅट्ट्रिकने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात कमिंसने टी-20 वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक घेतली.

2/7

कमिंसने जरी हॅट्ट्रिक घेतली असली तरी यशाने भारतासाठी वर्ल्डकप जिंकणं हा योगायोग ठरला आहे.

3/7

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियासाठी T20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा दुसरा खेळाडू आहे. 

4/7

यापूर्वी 2007 मध्ये वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला होता. ब्रेट लीने बांगलादेशविरुद्ध गट फेरीच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. 

5/7

योगायोगाची गोष्ट अशी की, कमिंसपूर्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने T20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती, तेव्हा भारताने वर्ल्डकप जिंकला होता. 

6/7

2007 मध्ये ब्रेट लीने हॅटट्रिक घेतली आणि प्रथमच झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून इतिहास घडवला होता. 

7/7

त्यामुळे आता कमिंसने हॅट्ट्रिक घेतली आहे, त्यामुळे योगायोगाने भारत पुन्हा चॅम्पियन होऊ शकतो, असं म्हटलं जातंय.