बांधकाम मजुराच्या हाती लागला सोन्याच्या नाण्यांचा खजिना

गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

| Mar 10, 2021, 12:47 PM IST

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : बांधकामासाठी खोदकाम करताना इतिहास कालीन (Historical 216 Gold Coin) सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinwad) शहरातील चिखलीमध्ये ही सोन्याची नाणी आढळली आहेत. (Construction Worker Found 216 Cold Coins)  ५२६ ग्रामच्या कांस्य धातूसारखा तुटलेला तांब्यामध्ये २३५७ ग्रॅम वजनाची २१६ सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

 

1/4

अशी मिळाली सोन्याची नाणी

अशी मिळाली सोन्याची नाणी

सलाम सालार खाँ पठाण या विठ्ठल नगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आरोपीने त्याच्या घरात सोन्याची नाणी बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पठाण याच्या घरातून नाणी जप्त केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पठाण याचे सासरे मुबारक शेख, मेव्हणा इरफान शेख हे तीन ते चार महिन्यांपूर्वी मजुरीच्या कामासाठी पठाण याच्याकडे आले होते.    

2/4

अशी मिळाली सोन्याची नाणी

अशी मिळाली सोन्याची नाणी

ते दोघे चिखली येथील बांधकामावर बिगारी म्हणून काम करीत होते. तेथे खोदकामाची माती फावड्याने भरत असताना सोन्याची पाच सहा जुनी नाणी त्यांना मातीत मिळून आली. ती नाणी  त्यांनी सदाम पठाण याला दाखवली. दुसऱ्या दिवशी सदाम पठाण व त्याचा मेव्हणा मुबारक शेख यांनी मातीचा ढीग उकरून कांस्य धातूसारखा तांब्या व सोन्याची नाणी मिळाली. ती नाणी त्यांनी  सदाम याच्या घरी आणून ठेवली होती.

3/4

नाण्याच्या वाटपावरून वाद

नाण्याच्या वाटपावरून वाद

नाण्यांच्या वाटपावरून वाद झाल्याने उघडकीस झालं आहे. सापडलेली नाणी कोणी किती घ्यायची यावरून सदाम पठाण आणि शेख यांच्यात वाद झाला. सुमारे तीन महिन्यांपासून वाटपावरून वाद सुरू होता. त्यावरून पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी नाणी जप्त केली. सोन्याच्या सध्याच्या बाजारभावाने एका नाण्याची किंमत ७० हजारांपर्यंत आहे. मात्र पुरातन असल्याने नाणी मौल्यवान असल्याचे सांगितले जाते आहे.

4/4

नाण्याचा इतिहास

नाण्याचा इतिहास

इतिहास कालीन ही नाणी १७२० ते १७५० या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहम्मद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याची पुरातत्त्व विभागाकडून माहिती मिळाली आहे.