धक्कादायक ! कोरोना काळात ७० लाखाहून अधिक PF खाते बंद

| Mar 16, 2021, 17:51 PM IST
1/5

EPFO च्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये देशात अनेक जण आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे पगारावर काम करणाऱ्या लोकांना खूप अधिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान 70 लाखाहून अधिक लोकांचे पीएफ खाते बंद झाले.

2/5

EPFO च्या खात्यात जे पैसे जमा केले जातात. ते लोकांना खूप गरज असेल तेव्हा काढता येतात. मागील वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान पीएफ खात्यातून 73,498 कोटी रुपये लोकांनी काढले होते. हा आकडा 2019 च्या तुलनेत 18 हजार कोटीपेक्षा अधिक आहे.

3/5

कोरोना काळात सरकारने पीएफ खात्यातून पैसे काढण्याची मुभा दिली होती. तेव्हा मूळ वेतन आणि महागाई भत्ता यातून नॉन-रिफंडेबल रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली होती. पण ती रक्कम 75 टक्के किंवा 3 महिन्यांचा महागाई भत्‍ता या बरोबरीची असली पाहिजे.

4/5

EPFO चा आकड्यानुसार हे स्पष्ट होतं की, कर्मचारी वर्गाला पीएफमध्ये गुंतवणूक करणं आवडतं. 2020-21 या आर्थिक वर्षात 31 मार्चनंतर सरकार जाहीर करेल. पण 2019-20 मध्ये 1.68 लाख कोटी, 2018-19 मध्ये 1.41 लाख कोटी, 2017-18 मध्ये 1.26 लाख कोटी जमा झाले आहेत.

5/5

ईपीएफओने आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफ खात्यांवर 8.50 टक्के व्याज दर देण्याची घोषणा केली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. सरकारच्या या घोषणेनंतर सामान्यांना दिलासा मिळाला आहे.