आयपीएलनंतर टीम इंडियाची खरी 'कसोटी', भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचं वेळापत्रक ठरलं, 32 वर्षांनंतर 5 सामने

India vs Australia Test Series : इंडियन प्रीमिअर लीग सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या मालिकेची चर्चा सुरु झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे.

| Mar 19, 2024, 21:45 PM IST
1/7

आयपीएलला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. पण त्याआधीच भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेची चर्चा सुरु झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान या वर्षाच्या अखेरीस पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे

2/7

आयपीएल संपल्यानंतर जून महिन्यात टी20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना पर्थमध्ये रंगणार आहे. 

3/7

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचे इतर कसोटी सामने एडिलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनीमध्ये खेळवले जातील. बॉक्सिंग डे कसोटी सामना दरवेळेप्रमाणे यावेळीही मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. तर नव्या वर्षात म्हणजे 2025 मध्ये दोनही संघ शेवटचा कसोटी सामना पर्थमध्ये खेळतील. 

4/7

एडलेडला खेळवला जाणारा कसोटी सामना पिंकबॉल टेस्ट म्हणजे डे-नाईट सामना असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचं अधिककृत वेळापत्रक या महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यत आहे. कसोटी मालिकेपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. 

5/7

1991-92 नंतर पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळले. 1991-92 च्या दौऱ्यात भारतीय संघाला 0-4 ने पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 

6/7

भारतीय क्रिकेट संघाने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 146 धावांनी पराभव केला होता. 

7/7

त्यानंतर 2020-21 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिका खेळवण्यात आली होती.