10 कोटी Debit-Credit कार्ड ग्राहकांचा डाटा लीक, धोक्यात लोकांची बॅंक अकाऊंट्स
Credit Card डेटा लीकः डेबिट, क्रेडिट कार्ड वापरणार्या धोका आहे.
Credit Card डेटा लीकः डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरणार्या कोट्यवधी लोकांना धोका निर्माण झाला आहे. 10 कोटी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांचा डेटा लीक झाल्याची बातमी आहे. ज्यांचा डेटा चोरीला गेला आहे अशा लोकांची बँक खाती अडचणीत येऊ शकतात.
1/4
रिपोर्ट्सनुसार कार्डधारकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर (Dark Web) विकली जात असल्याचे सांगितले जात आहे. ज्या लोकांची माहिती लीक झाली आहे, त्यांच्यासाठी ही धोक्याची बाब आहे, कारण खातेदारांचे नाव, त्यांचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी यासारख्या संवेदनशील माहिती लीक झाल्या आहेत. तसेच, क्रेडिट आणि डेबिट कार्डचे पहिले चार अंक आणि शेवटचे चार अंक, कार्डची समाप्ती तारीख देखील लीक झाली आहे, जी डार्क वेबवर विकली जात आहे.
2/4
3/4