...अन् तिने पायानेच लावला फडणवीसांच्या कपाळावर टिळा; डोळे पाणावणारे फोटो पाहाच

Devendra Fadnavis Jalgaon Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या कामांनिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांचे, जिल्ह्यांचे दौरे करत असतात. मंगळवारी फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना काही खास अनुभव आले. फडणवीस यांनीच अगदी डोळे पाणावणाऱ्या या क्षणांबद्दलची माहिती पोस्टमधून दिली. पाहूयात फडणवीस काय म्हणालेत....

| Jun 28, 2023, 08:36 AM IST
1/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी जळगावमध्ये होते. या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. तसेच त्यांनी अगदी पंगतीत बसून उत्तर महाराष्ट्रातील खास पदार्थांवर ताव मारला.

2/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (28 जून 2023 रोजी) जळगावमधील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ संस्थेला भेट दिली. 

3/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

या भेटीच्या वेळी फडणवीस यांचं औक्षण एका खास मुलीने केला. हे औक्षण पाहून फडणवीस यांनाही अश्रू अनावर झाले. फडणवीस यांनीच हे फोटो शेअर केले आहेत.

4/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

"आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं," असंही फडणवीस पोस्टमध्ये म्हणाले.

5/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

"आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे," असं म्हणत फडणवीस यांनी काही फोटो शेअर केले आहेत.  

6/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे," असं या मुलीच्या धैर्याचं वर्णन करताना फडणवीस यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं आहे.

7/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

"ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" असं म्हणत फडणवीस यांनी पोस्ट संपवली आहे.

8/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

‘मनोबल’ संस्थेचं काम कसं चालतं याबद्दलची सविस्तर माहिती फडणवीस यांनी घेतली.

9/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

फडणवीस यांनी ‘मनोबल’ संस्थेमधील मुलांची भेट घेतली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. फडणवीस यांच्या भेटीने मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

10/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान खास भाकरी आणि वांग्याच्या भरीतावर ताव मारल्याचं पहायला मिळालं.

11/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

चक्क उपमुख्यमंत्री आपल्या हाताने बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आल्याचं पाहून येथील महिलांनाही विशेष आनंद झाल्याचं पहायला मिळालं.

12/12

Devendra Fadnavis Jalgaon Visit

यावेळेस फडणवीस यांच्याबरोबर गिरीश महाजन आणि अन्य मान्यवर मंडळीही होती.