लिंबू-टिंबूंकडून पराभूत होणं ही इंग्लंडची 'परम्परा , प्रतिष्ठा, अनुशासन'च; वाचा क्रिकेट शोधणाऱ्यांचा रंजक इतिहास

England Team : रविवारी झालेल्या अफगाणिस्तान विरूद्ध इंग्लंड यांच्या सामना रंगला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला. दरम्यान यावेळी सर्व क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

Oct 16, 2023, 13:25 PM IST
1/5

वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत छोट्या टीमकडून पराभव स्विकारण्याची इंग्लंडच्या टीमची ही काही पहिली वेळ नव्हती. 

2/5

2011 साली झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या स्पर्धेत आयरलँडच्या टीमने इंग्लंडचा पराभव केला होता. इंग्लंडच्या टीमने 327 रन्सचं लक्ष्य आयरलँडला दिलं होतं. त्यानंतर 3 विकेट्सने इंग्लंडचा पराभव झाला होता. 

3/5

इंग्लंडवर 2015 च्या वनडे वर्ल्डकपमध्येही अशीच परिस्थिती उद्धवली होती. यावेळी बांगलादेशाच्या टीमने इंग्लंडच्या टीमचा 15 रन्सने पराभव केला.

4/5

यानंतर आता सुरु असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये आफगाणिस्तानच्या टीमने 69 रन्सने इंग्लंडच्या टीमला धूळ चारली.

5/5

सध्या वनडे वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंडची टीम पाचव्या क्रमांकावर आहे.