'देसी गर्ल'चा बॅकलेस लूक व्हायरल

प्रियांका तिच्या आगामी 'स्काय इज पिंक' चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणासाठी भारतात आली आहे.

Jun 06, 2019, 16:34 PM IST

मुंबई : जगातील सर्वात आवडतं व्यक्तीमत्व असलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या मायदेशी दाखल झाली आहे. नुकताच तिने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. या फोटोंमधील तिचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार प्रियांका तिच्या आगामी 'स्काय इज पिंक' चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणासाठी भारतात आली आहे. या गाण्यात प्रियांका शिवाय फरहान अख्तर आणि झायरा वसीम एकत्र झळकणार आहे.

1/5

प्रियांका चोप्रा मुंबईमध्ये दाखल

प्रियांका चोप्रा मुंबईमध्ये दाखल

भारत देशात दाखल होण्याआधी प्रियंकाने अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूट केले होते. सोशल मीडियावर तिचा हा देसी अंदाज चांगलाच व्हायरल होत आहे. 

2/5

साडी म्हणजे भारतीय संस्कृती

साडी म्हणजे भारतीय संस्कृती

मुखपृष्ठासाठी फोटोशूट केल्यानंतर तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'फॅशनच्या जगात संस्कृती सर्वात महत्वाचा भाग आहे. काही गोष्टी वेळेनुसार पारंपरीक संस्कृतीचा दर्जा घेतात. भारतात साडीला अनन्यसाधारण महत्व आहे, आणि या पारंपरीक संस्कृतीची जागा कोणतेच दुसरे कपडे घेवू शकत नाही. '  

3/5

मुंबईच्या विमानतळावर प्रियांकाला स्पॉट केले.

मुंबईच्या विमानतळावर प्रियांकाला स्पॉट केले.

सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल्या साडीत प्रियांका अतिशय आकर्षक दिसत आहे. तिच्या या आकर्षक रूपाला बॅकलेस ब्लाऊजची जोड कमालीची वाटत आहे.  

4/5

बॅकलेस ब्लाऊजमध्ये प्रियांकाचा आकर्षक लूक

बॅकलेस ब्लाऊजमध्ये प्रियांकाचा आकर्षक लूक

प्रियांकाच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत हा फोटो १२ लाख चाहत्यांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

5/5

प्रियांकाने भारताचे पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

प्रियांकाने भारताचे पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांकाने पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्ती केली होती. ती म्हणाली, 'मला पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा आहे, तर निकला राष्ट्रपती होण्याच्या शर्यतीत सहभागी व्हायचे आहे.'