बॉलिवूडच्या 'या' 5 अभिनेत्यांच्या Extra Marital Affair ला पत्नींची होती मान्यता?

Bollywood Extra Marital Affairs : बॉलिवूडमध्ये ज्या कलाकरांना आपण आपले आदर्श मानतो  अशा कलाकारांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. विशेष म्हणजे  या कलाकारांच्या पत्नींनी देखील त्यांच्या पतीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर स्वीकारल्याचे स्पष्ट होते. आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत. 

| Jul 28, 2024, 17:32 PM IST
1/7

राज कपूर

'श्री 420'  या चित्रपटात अभिनेत्री नर्गिससोबत काम करताना राज कपूर त्यांच्या प्रेमात पडले. राज कंपूर यांची पत्नी कृष्णा कपूरला या अफेयरची माहिती होती, पण तरीही त्यांनी राज कपूर यांना सोडण्याचा निर्णय घेतला नाही.

2/7

ऋषी कपूर

ऋषी कपूर यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांनी एका जुन्या मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल खुलासा केला होता. नीतु कपूर म्हणाल्या की 'मला माहित होत की ते त्यांचे फक्त  (one night stand) एका रात्री पूर्तीचे संबंध आहेत.'  

3/7

नीतू कपूर यांचा खुलासा...

नीतू कपूर याविषयी बोलताना पुढे म्हणाल्या 'साधारण दोन वर्षां आधीपर्यंत, मी यावरून त्याच्याशी भांडत होते. परंतु आता मी या गोष्टींचा स्वीकार केला आहे की बघू तो हे किती दिवस करतो.'   

4/7

धर्मेंद्र

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय जोडी आहे. याचे कारण त्यांचे लग्न आहे. 'तुम हसीन मैं जवान' या चित्रपटादरम्यान त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

5/7

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर

मात्र, ही गोष्ट कळल्यानंतरही धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट दिला नाही. म्हणूनच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना धर्म बदलून लग्न करावे लागले.

6/7

सनी देओल

'गदर' स्टार अभिनेता सनी देओल विवाहित असूनही डिंपल कपाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. विशेष म्हणजे ट्विंकल खन्नाही त्याला छोटे पापा म्हणायची. सनीची पत्नी पूजा देओल हिलाही या अफेअरचे वारे लागले पण तरीही तिने नाते तोडले नाही.

7/7

शत्रुघ्न सिन्हा

didthis5bollywoodactorswifeapprovedtheirExtraMaritalAffairs

बॉलिवूडचा शॉटगन शत्रुघ्न सिन्हा एकेकाळी पूनम सिन्हा आणि रीना रॉय या दोघींसोबत रिलेशनशिपमध्ये होते. असे सांगितलं जात की त्यांनी पूनम सिन्हा यांना लग्नाचे वचन दिले होते म्हणून त्यांनी रीना रॉयशी लग्न केले नाही. पण लग्नानंतरही शत्रुघ्न सिन्हा बराच काळ रीना रॉयसोबत रिलेशनमध्ये होते.