….म्हणून विवस्त्र आंघोळ करु नये! काय आहे मागील तथ्य, शास्त्र आणि विज्ञान काय सांगत?

शास्त्रात आंघोळीबद्दल काही नियम सांगण्यात आलंय. आंघोळ करताना अंगावर एक तरी कपडा असावा असं सांगण्यात आलंय. काय आहे मागे शास्त्र आणि वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत.

नेहा चौधरी | Feb 14, 2025, 22:45 PM IST
1/9

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीबद्दल नियम आणि रितीरिवाज सांगितले गेले आहे. तसंच आंघोळीबद्दलही काही नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. पुराणात याबदद्ल माहिती देण्यात आलीय.         

2/9

श्रीमद भागवत पुराणातील दहाव्या स्कंधात आणि बाविसाव्या अध्यायात असं नमूद आहे की, कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केलं होतं. हे व्रत करताना गोपिका यमुना नदीत व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन स्नान करत होत्या. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की, यूयं विवस्त्रा यदपो धृतव्रता, व्यगाहतैतत तदु देवहेलनम बद्धवांजली मुर्धन्यपनुत्तयेsहस: कृत्त्वा नमोsधो वसनं प्रगृह्यताम !!

3/9

या श्लोकाचा अर्थ असा होतो की, मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान करत आहात. त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना होत आहे. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे परिधान करा. याचा अर्थ असा होता की, जेव्हा आपण अंगावर एकही कपडा घालून आंघोळ करतो तेव्हा जलदेवता आणि वरुण देवता यांचा अपमान होतो. त्यामुळे कधीही विवस्त्र होऊन आंघोळ करु नका. 

4/9

शास्त्रानुसार तुम्ही नग्न का आंघोळ करू नये?

पौराणिक कथांमध्ये असं सांगण्यात आलंय की, विवस्त्र स्नान करण्यास करु नये यामागील सर्वात मोठं कारण असं आहे की, श्रीकृष्ण जेव्हा पृथ्वीवर होते, तेव्हा बालकृष्णाने एकदा गोपी सरोवरात स्नान करत असताना त्यांचे सर्व कपडे लपवले होते. त्यावेळी गोपीका विवस्त्र स्थितीत होत्या. जेव्हा गोपींना लक्षात आले की त्यांचे कपडे किनाऱ्यावरून नाहीत, तेव्हा त्यांनी कृष्णाची प्रार्थना केली आणि त्यांना त्यांचे कपडे परत देण्याची विनंती केली. 

5/9

मग, कृष्णाने त्यांना समजावून सांगितलं की कपडे न घालता कुठेही स्नान करू नये. हे पाण्याचे देव वरुण यांचा अपमान करते. यामुळे, तुम्ही कधीही नग्न स्नान करू नये. श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला वाटते की मी तिथे नव्हतो, पण मी प्रत्येक क्षणी सर्वत्र उपस्थित असतो. इथे आकाशात उडणारे पक्षी आणि जमिनीवर चालणारे प्राणी यांनी तुला नग्न पाहिले. जेव्हा तुम्ही नग्न अवस्थेत पाण्यात गेलात, तेव्हा पाण्यात उपस्थित असलेल्या प्राण्यांनी तुम्हाला नग्न पाहिले आणि शिवाय, पाण्यात नग्न अवस्थेत प्रवेश करून, पाण्याच्या रूपात उपस्थित असलेल्या वरुण देवाने तुम्हाला नग्न पाहिले आणि हा त्यांचा अपमान आहे आणि यासाठी तुम्ही पापाचे दोषी आहात  

6/9

बंद खोलीत आंघोळ करताना आपल्याला कोणी पाहत नाही असे आपल्याला वाटते, तर असे मानले जाते की देव तुम्हाला सर्वत्र पाहतो आणि जर तुम्ही नग्न स्नान केले तर ते पाण्याच्या देवता वरुणाचा अपमान मानले जाते. नग्न स्नान केल्याने पाप होऊ शकते आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलंय.   

7/9

गरुड पुराणात असं म्हटलं गेलंय की स्नान करताना तुमचे पूर्वज तुमच्याभोवती असतात आणि त्यांना तुमच्या कपड्यांमधून पडणारे पाणी मिळतं ज्यामुळे त्यांना तृप्ती मिळतं. नग्न स्नान केल्याने पूर्वज असंतुष्ट आणि क्रोधित होतात, ज्यामुळे व्यक्तीचे तेज, शक्ती, संपत्ती आणि आनंद नष्ट होतात. म्हणून, कधीही विवस्त्र स्नान करू नये.  

8/9

ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात की, नग्न स्नान केल्यास तुमच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते. त्यामुळे आंघोळ करताना शरीरावर एक तरी कपडा असावा.   

9/9

हे असू शकतं या नियमामागील अजून एक कारण

पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होत्या. त्या काळात आता सारखी बाथरुम नव्हती. नदी, विहिरीवर आंघोळ करावी लागत असे. त्या काळात फार कमी घरात न्हाणीघर होती, ज्यांना दरवाजा नसायचा. अशावेळी कोणी नग्न अवस्थेत तुम्हाला पाहू नये म्हणून अंगावर एकतरी कपडा घातला जावा यामागे हा नियम होता.