भाज्यांची सालं, टरफलं काढून शिजवताय? हीच चूक महागात पडेल
Vegetables Skin Benefits : अनेक भाज्या अशा आहेत ज्याची साल न काढता तुम्ही ती तशीच शिजवली तर त्यामधून सर्वाधिक पोषकतत्त्वे आणि जीवनसत्त्वे मिळू शकतात.
vegetable skin you can eat: भाज्यांचा समावेश हेल्दी डाएटमध्ये येतो. ऍक्टिव आणि हेल्दी राहण्यासाठी भाजी खाणे अत्यंत गरजेचे असते. निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी भाजीचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. भाजीचा आहारात समावेश करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. जसे की, भाजी सर्वात आधी धुवून घेतली जाते त्यानंतर त्याची साल किंव टरफलं काढून ती शिजवली जाते, ही भाजी बनवण्याची सामान्य पद्धत आहे. कारण काही भाज्या सालीसकट खाणे फायदेशीर ठरतात. आपण अशाच काही भाज्या पाहणार आहोत.