धर्मः पितृपक्षात सोनं झालं स्वस्त, पण या काळात सोनं-चांदी खरेदी करावं का?

सोन्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत चढ-उतार होत आहेत. मात्र पितृपक्ष असल्यामुळं सोन्याची खरेदी करणे शुभ असतं का? असे अनेक सवाल निर्माण होतात. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया. 

| Sep 19, 2024, 14:34 PM IST

Pitru Paksha 2024: सोन्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत चढ-उतार होत आहेत. मात्र पितृपक्ष असल्यामुळं सोन्याची खरेदी करणे शुभ असतं का? असे अनेक सवाल निर्माण होतात. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया. 

1/7

धर्मः पितृपक्षात सोनं झालं स्वस्त, पण या काळात सोनं-चांदी खरेदी करावं का?

does Buying ornaments made of gold, silver, or diamonds in pitru paksha is good

 हिंदू धर्मात पितृपक्षाचे महत्त्व आहे. पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण केले जाते. पूर्वजांच्या नावे श्राद्ध करुन पितरं जेवायला घालतात. त्यामुळं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. हिंदु धर्मानुसार, पितृपक्षात शुभ कार्य करणे टाळावे असं म्हटलं जातं. 

2/7

does Buying ornaments made of gold, silver, or diamonds in pitru paksha is good

गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आजही सोनं स्वस्त झालं आहे. मात्र पितृपंधरवडा असल्याने या दिवसांत सोनं खरेदी करणं शुभ असतं का? असं प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतील. तर आज त्याची उत्तरे जाणून घेऊया. 

3/7

does Buying ornaments made of gold, silver, or diamonds in pitru paksha is good

 पितृपक्षात शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते. तसंच, नवीन कपडे खरेदी करणं, नव्या वस्तु खरेदी करणे टाळले जाते. मात्र या पितृपक्षात एक दिवस हा शुभ मानला जातो. 

4/7

does Buying ornaments made of gold, silver, or diamonds in pitru paksha is good

पितृपक्षात सोनं व चांदी खरेदी करणे वर्ज्य आहे. कारण या काळात पितरांचे स्मरण होत असल्याने मोठी खरेदी करणे टाळावे, असं मानलं जातं. मात्र एका तिथीनुसार या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानण्यात येतं. 

5/7

does Buying ornaments made of gold, silver, or diamonds in pitru paksha is good

पितृपक्षात येणाऱ्या अष्टमीला देवी लक्ष्मीचे वरदान प्राप्त आहे. त्यामुळं या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. तसंच, या दिवशी सोनं खरेदी केल्याने ते आठपट वाढते, अशी धारणा आहे.

6/7

does Buying ornaments made of gold, silver, or diamonds in pitru paksha is good

पितृपक्षातील अष्टमीला हत्तीवर विराजमान लक्ष्मीची पूजा करणेही लाभदायक ठरते, असंही शास्त्रात सांगितले आहे.

7/7

does Buying ornaments made of gold, silver, or diamonds in pitru paksha is good

 ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )