... म्हणून वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर निघताना घंटा वाजवत नाहीत?

मंदिरात प्रवेश करताना भाविक घंटी वाजवून मगच गाभाऱ्यात जातात. मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवण्यामागे अध्यात्मिक आणि धार्मिक पैलु आहेत. पण तुम्हाला माहितीये का मंदिरातील घंटीबाबत वास्तुशास्त्रातही काही नियम सांगितले आहेत.

| Mar 28, 2024, 18:22 PM IST

Temple Ring Bell: मंदिरात प्रवेश करताना भाविक घंटी वाजवून मगच गाभाऱ्यात जातात. मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवण्यामागे अध्यात्मिक आणि धार्मिक पैलु आहेत. पण तुम्हाला माहितीये का मंदिरातील घंटीबाबत वास्तुशास्त्रातही काही नियम सांगितले आहेत.

1/7

... म्हणून वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर निघताना घंटा वाजवत नाहीत?

 dont ring temple bell while go outside know reason in marathi

 वास्तुशास्त्रात मंदिरातील घंटीचा संबंध सकारात्मक उर्जेशी जोडला गेला आहे. वास्तुशास्त्रानुसार, मंदिरातील घंटा ही सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. 

2/7

कारण काय?

 dont ring temple bell while go outside know reason in marathi

अनेकांना फक्त इतकंच माहिती असते की मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवून मगच गाभाऱ्यात प्रवेश करावा. पण काही जण मंदिरातून बाहेर पडतानादेखील घंटी वाजवतात. पण, वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. मंदिरातून बाहेर पडताना कधीच घंटी वाजवू नये, याचे कारण काय जाणून घेऊया.   

3/7

मंदिरात घंटी का वाजवतात?

 dont ring temple bell while go outside know reason in marathi

ध्वनीचा संबंध उर्जेशी जोडून बघितला जातो. असं म्हणतात की, जेव्हा पण मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवली तेव्हा, त्या नादामुळं आसपास असलेल्या लोकांमध्ये उर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्राबरोबरच स्कंदपुराणातही त्यांचा उल्लेख आढळतो. 

4/7

ॐ ध्वनी

 dont ring temple bell while go outside know reason in marathi

जेव्हापण कोणी मंदिरातील घंटी वाजवतो तर तो ध्वनी 'ॐ'ध्वनीप्रमाणे येतो. 'ॐ' हा ध्वनी खूपच शुद्ध आणि सकारात्मक उर्जेशी जोडला जातो. त्यामुळं मंदिरात प्रवेश करत असताना घंटी वाजवली जाते. 

5/7

वैज्ञानिक कारण

 dont ring temple bell while go outside know reason in marathi

घंटी वाजवण्यामागे एक वैज्ञानिक कारणदेखील आहे. मंदिरातील घंटी वाजवल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजामुळं वातावरणात तेज कंपन निर्माण होते. त्यामुळं आसपास असलेले जिवाणी-विषाणु नष्ट होतात. त्यामुळं वातावरण शुद्ध करण्यासाठी मंदिरात घंटी वाजवली जाते. 

6/7

मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजवली पाहिजे का?

 dont ring temple bell while go outside know reason in marathi

अनेकांच्या मनात हा सवाल येतो की, मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा घंटी वाजवली पाहिजे का? अनेकजण हा विचार न करताच घंटी वाजवून मंदिरातून बाहेर पडतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार, मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजवली नाही पाहिजे. त्यामुळं मंदिरातील सकारात्मक उर्जेचा भंग होतो व तुम्हाला मिळालेली सकारात्मक उर्जादेखील तुम्ही तिथेच सोडून बाहेर येता. त्यामुळं मंदिरातून निघताना कधीच घंटा वाजवू नये, असं शास्त्रात सांगितले आहे.  

7/7

... म्हणून वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर निघताना घंटा वाजवत नाहीत?

 dont ring temple bell while go outside know reason in marathi

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )