हिवाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Drinking lemon water in winter is good or bad for health : उन्हाळ्यात मोठ्या संख्येने लोकं लिंबू पाण्याचे सेवन करतात. असं म्हणतात रिकाम्या पोटी लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते तसेच यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण काहीजण हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळतात. बऱ्याच जणांना वाटतं की हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला सारखे आजार होतात. पण खरंच हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळायला हवे का? याबाबत तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.  

| Oct 24, 2024, 19:58 PM IST
1/6

आहारतज्ञांच्या माहितीनुसार लिंबू पाणी पिणं प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यासाठी चांगलं ठरतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही. हिवाळ्यात इन्फेक्शन आणि आजारांचे प्रमाण वाढते.   

2/6

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा असते. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. त्यामुळे आजारांचा धोका कमी होऊ शकतो. लिंबू पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीरातील आजारांशी लढण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप यासारख्या आरोग्याच्या समस्या कमी होतात.  

3/6

आहारतज्ञांच्या मते हिवाळ्यात अनेकजण कमी पाणी पितात. काहीजण तर केवळ 2 ते 4 ग्लासचं पाणी पितात. अशावेळी शरीरात पाण्याची कमतरता होते आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तेव्हा डिहायड्रेशन पासून वाचायचं असेल तर लिंबू पाण्याचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.   

4/6

त्वचा हेल्दी आणि हायड्रेटेड राहते :

हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा हेल्दी आणि हायड्रेटेड राहते. तसेच या ऋतूमध्ये अनेकजण जड अन्न आणि फॅटी फूड्सचे सेवन करतात त्यामुळे पचना संबंधित समस्या निर्माण होतात.  लिंबू पाणी पचनक्रियेसाठी उपयोगी ठरते तसेच यामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा मदत होते. 

5/6

बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत :

आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार हिवाळ्यात कोमट पाण्यात लिंबू पिळून त्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत मिळते, वजन कमी सुद्धा कमी होते. 

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)