जेवताना पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या 5 गंभीर दुष्परिणाम

Drinking Water While Eating: जेवताना अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. तुम्हालाही जर ही सवय असेल तर तुम्ही आरोग्याला गंभीर धोके निर्माण करत आहात. कारण जेवताना पाणी पिणं आरोग्यासाठी योग्य नाही. कारण जेवताना नाही, तर जेवण झाल्यावर पाणी पिणं योग्य असून तशी सवय लावून घ्या.  

May 03, 2023, 10:48 AM IST
1/6

पाणी पिणं निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. शरिरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास अनेक त्रास जाणवू शकतात. त्याचप्रमाणे पाणी चुकीच्या वेळी प्यायल्यासही अनेक समस्या उद्ववू शकतात.   

2/6

पचनक्रियेत अडथळा - जेवताना किंवा जेवून झाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर परिणाम होतो. लगेच पाणी पिणं पचनक्रियेत अडथळा निर्माण करतं.  

3/6

इन्सुलिनची पातळी वाढते -  शरिरातील इन्सुलिन नावाचे हार्मोन स्वादुपिंडाद्वारे सोडले जाते. हे प्रमाण वाढत मधुमेहाचा धोका वाढू शकतो.   

4/6

अॅसिड रिफ्लेक्सचा त्रास -  जेवताना पाणी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे आंबट ढेकर येतात. तसंच छातीत जळजळही होते.   

5/6

वजन वाढू शकतं - जेवताना पाणी प्यायल्याने लठ्ठपणाचा धोका संभावतो. अन्न नीट न पचल्याने लठ्ठपणाची भीती असते.   

6/6

पोषक तत्त्वांची कमतरता -  पचनसंस्था अन्नातील पोषक तत्वं शोषून घेत असते. पण पाणी प्यायल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे पोषक तत्त्वांचा योग्य पुरवठा होत नाही.