Celebs who Lost Temper : आदित्यनं फेकला माईक, प्रियांकानं लगावली कानशिलात; चाहत्यांवर 'या' सेलिब्रिटींनीही उगारला हात

Celebs who Lost Temper : अमुक एका अभिनेत्याच्या जीवनात नेमकं काय सुरुये इथपासून तमूक एका अभिनेत्रीनं आता नेमकी कोणती स्टाईल फॉलो केलिये इथपर्यंतची माहिती या माध्यमातून मिळते. याशिवायच माहिती मिळते ती म्हणजे सेलिब्रिटी आणि त्यांच्या भोवती असणाऱ्या वादाच्या वलयाची. 

Feb 13, 2024, 11:52 AM IST

Celebs who Lost Temper : सेलिब्रिटीं मंडळी आणि त्यांच्या आयुष्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी माहिती चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवते. 

 

1/7

Celebs who Lost Temper

Elvish yadav Aditya Narayan And other Celebs who Lost Temper

Celebs who Lost Temper : तुम्हाला माहितीये का, गेल्या काही दिवसांपासून कलाजगतामधून अशा काही घटना समोर आल्या आहेत जिथं सेलिब्रिटी मंडळींचा संताप अनावर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.   

2/7

आदित्य नारायण

Elvish yadav Aditya Narayan And other Celebs who Lost Temper

अभिनेता आणि गायक आदित्य नारायण सध्या एका नकोशा कारणामुळं चर्चेत आहे. छत्तीसगढच्या भिलाई इथं एका कार्यक्रमादरम्यान त्यानं चाहत्यांना चुकीची वागणूक दिली, त्यांचा फोन घेत त्यानं माईकही त्यांच्या दिशेनं भिरकावला.   

3/7

एल्विश यादव

Elvish yadav Aditya Narayan And other Celebs who Lost Temper

जयपूरमधील एका रेस्तराँमध्ये झालेल्या वादामध्ये एल्विश यादवनं एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.   

4/7

प्रियांका चोप्रा

Elvish yadav Aditya Narayan And other Celebs who Lost Temper

2015 मध्ये प्रियांकानं गंगाजल चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान, एका चाहत्याच्या कानशिलात लगावली होती.   

5/7

शाहरुख खान

Elvish yadav Aditya Narayan And other Celebs who Lost Temper

सहसा शाहरुख खान त्याच्या चांगल्या स्वभावासाठी ओळखला जातो. पण, त्याचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ या समजुतीचा शह देतो. शाहरुखनं एकदा विमानतळावर सेल्फी घेण्यासाठी म्हणून आलेल्या एका चाहत्याला धक्का देत तो पुढे गेला होता.   

6/7

मिका सिंग

Elvish yadav Aditya Narayan And other Celebs who Lost Temper

गायक मिका सिंगनंसुद्धा एकदा चाहत्याच्या कानशिलात लगावली होती. चाहत्यानं मद्यपान केल्याचं कारण त्यानं पुढे केलं होतं.   

7/7

विल स्मिथ

Elvish yadav Aditya Narayan And other Celebs who Lost Temper

अभिनेता विल स्मिथ यानं 2022 मध्ये सूत्रसंचालकान त्याच्या पत्नीवर विनोदी टीप्पणी करताच त्याच्या कानशिलात लगावली होती.