Sweet Home : अवघ्या 20 व्या वर्षात या अभिनेत्रींची मोठी झेप, मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर

Actress Who Bought New House at Young Age: मुंबईत (Mumbai) हक्काचं घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण मुंबईत घर घेण्यासाठी आयुष्यभराची कमाई पणाला लागते. पण बॉलिवूडमध्ये (Bollywood) अगदी कमी वयात आपली छाप उमटवणाऱ्या काही अभिनेत्रींनी (Actress) मुंबईत हक्काचं घर घेतलंय. अवघ्या 15 ते 20 वर्षांदरम्यानच या अभिनेत्रींचं मुंबईत स्वत:चं अलिशान घर आहे. जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री.

Feb 27, 2023, 20:43 PM IST
1/5

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सुम्बुल तौकीरने मुंबईत अलिशान घर घेतलं आहे. सुम्बुलने आपल्या नव्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घराचं सध्या इंटेरिअर सुरु असून सुम्बुलने त्यासाठी आपल्या चाहत्यांकडून मतंही मागवली आहेत. छोट्या पडद्यावरील इमली ही हिंदीतल लोकप्रिय मालिका आणि बिग बॉस 16 मधून सुम्बुलने आपली ओळख निर्माण केली आहे. 

2/5

Jannat Zubair

जन्नत झुबेर ही आता 21 वर्षांची आहे. पण 2 वर्षांपूर्वीच तीने मुंबईत आपल्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. या इमारतीचं सध्या काम सुरु असून जन्नते आपल्या वडिलांबरोबर इमारतीच्या बांधकामाचा फोटो शेअर केला होता. 

3/5

Avneet Kaur

अवनीत कौर ही छोट्या पडद्यावरील सर्वात स्टाईलिश आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अवनीत अवघ्या 18 व्या वर्षी मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे. अवनीत कौर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तीचे लाखो फॉलोअर्स आहेत.

4/5

Ashnoor Kaur

अभिनेत्री अशनूर कौरने टीव्हीच नाही तर चित्रपटातही अभिनय केला आहे. अभिनयातून कमावलेली संपत्ती तिने वाया जाऊ दिली नाही. आपल्या कमाईतून तीने मुंबईत ड्रोम होम खरेदी केलं आहे. याचे काही फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

5/5

Ruhaanika dhawan

ये है मोहब्बते या मालिकेतील रूहानिकाला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. या मालिकेतून रुहानिका घराघरात पोहोचली. अवघ्या 15 वर्षी लोकप्रिय धालेल्या रुहानिकाने मुंबईत अलिशान घर विकत घेतलं आहे.