भांगेत सिंदुर, हातात गुलाबी चुडा! लग्नानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाले Kiara-Sid... एअरपोर्टवरचा Video व्हायरल

Kiara Sidharth First Look: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) 7 फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकले. राजस्थानमध्ये कियारा-सिडचं रॉयल वेडिंग पार पडलं. त्यानंतर आज दोघंही एअरपोर्टवर स्पॉट झाले. दोघंही अगदी कॅज्युअल लूकमध्ये पाहिला मिळाले. कियारा आणि सिद्धार्थला पाहण्यासाठी जैसलमेर एअरपोर्टवर चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

Feb 08, 2023, 19:01 PM IST
1/6

लग्नानंतर नवदाम्पत्य जैसलमेर एअपोर्टवर पोहोचलं, यावेळी दोघंही अगदी कॅज्युअल लूकमध्ये होते. कियाराने ब्लॅक लोअर आणि टॉप परिधान केला होता, त्यावर तीने प्रिंटेड स्टॉल ओढला होता. कियाराच्या भांगेत सिंदूर आणि हातात लाल चुडा अगदी शोभून दिसत होता. 

2/6

सिद्धार्थ मल्होत्राही कॅज्युअल लूकमध्ये होता. त्याने जींस, टी-शर्ट आणि जॅकेट परिधान केला होता आणि नेहमीसारखाच तो हँडसम दिसत होता. दोघांची जोडी खूप आनंदी दिसत होती.

3/6

मिळालेल्या माहितीनुसार जैसरमेल एअरपोर्टवरुन कियारा आपल्या सासरी म्हणजे सिद्धार्थ्याच्या दिल्लीतल्या घरी जाणार आहे. इथे त्यांच्या लग्नाची इतर विधी पार पडतील. त्यानंतर दिल्लीत एक भव्य रिसेप्शन आयोजित केलं जाणार असल्याची माहिती आहे. 

4/6

कियारा-सिद्धार्थच्या आधी सिद्धार्थचे आजोबा, आई, वडिल आणि भाऊ एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. सर्व जण विमानाने दिल्लीला रवाना झाले.

5/6

विमानतळावर सिद्धार्थच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचीच मनं जिंकली. एअरपोर्टवर पोहोचलेल्या सिद्धार्थच्या आईला मीडियाने प्रश्न विचारल्याने तीने आज खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरी आल्याचं तीने म्हटलं.

6/6

कियारा आणि सिद्धार्थने 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलमध्ये सात फेरे घेतले. रात्री उशीरा त्यांनी लग्नाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.