मुकेश अंबानी यांच्या नातवाच्या वाढदिवसाला 'तारे जमिन पर' पाहा Exclusive Photo

Prithvi Ambani Birthday Photos: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबात दोन दिवसांपूर्वीच त्यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Murchant) यांचा साखरपूडा संपन्न झाला. आता मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि सून श्लोका मेहता (Shloka Mehta) यांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी ग्रँड पार्टीचं (Grand Party) आयोजन करण्यात आलं होतं. मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी (Prithvi Akash Ambani) यांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्ताने जिओ गार्डनमध्ये ही पार्टी ठेवण्यात आली होती.

Jan 02, 2023, 20:22 PM IST
1/6

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांनी मुंबईतल्या जिओ गार्डनमध्ये भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आकाश आणि श्लोका यांचा मुलगा पृथ्वी याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्ताने ही पार्टी देण्यात आली. 

2/6

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांनी मीडियाला अगदी मनसोक्स पोझ दिल्या. श्लोका यावेळी खूपच आनंदी दिसत होती. 

3/6

पृथ्वी अंबानीच्या वाढदिवसानिमित्ताने वंडरलँड अशी थीम ठेवण्यात आली होती. गार्डनच्या गेटवरच वंडरलँडची कमान उभारण्यात आली होती. तर गेटला नीळ्या फुग्यांची सजावट करण्यात आली होती

4/6

या पार्टीसाठी दिग्दर्शक करण जोहर हा आपली दोन्ही मुलं रुही आणि यश यांच्यासह उपस्थित होता. करण जोहरने ब्लॅक जॅकेटसह ब्लॅक जीन्स परिधान केली होती

5/6

या पार्टीसाठी मुकेश अंबानी दाखल होताच, स्वत: आकाश अंबानी त्यांना घेण्यासाठी गेटवर आले. दोघांनी कॅमेरासमोर पोझही दिल्या. 

6/6

प्रसिद्ध डिरेक्टर आणि रणबीर कपूरचा जवळचा मित्र अयान मुखर्जी कॅज्युअल लूकमध्ये या पार्टीत दिसला. अयाने चेक शर्टसोबत ग्रे कलरची जीन्स परिधान केली होती.