बाबो! जगातला सर्वात महागडा चहा, चहाच्या एका घोटाची किंमत कोट्यावधींच्या घरात

Most Expensive Tea: चहा प्यायला कोणाला आवडत नाही? काही व्यक्तींच्या दिवसाची सुरुवातच चहाच्या घोटाने होते. मात्र तुम्हाला माहितीये का सर्वात महागडा चहा कोणता? आणि तो नेमका कुठे मिळतो? चला तर मग आज जाणून घेऊया.

Nov 17, 2022, 19:32 PM IST
1/5

चहाची सर्वात महागडी चहा पावडर ही चीनमध्ये मिळते. तुम्हाला या चहाच्या पावडरसाठी प्रतिकिलो 9 कोटी मोजावे लागणार आहेत. 

2/5

ही एक वेगळ्या प्रकारची चहा असून या चहा पावडरचं नाव 'डा होंग पाओ टी' असं आहे. 

3/5

चीनच्या फुजियानमधल्या वुईसन भागामध्ये ही सर्वात चहा पावडर मिळते. खास गोष्ट म्हणजे केवळ याच ठिकाणी तुम्हाला ही चहा पावडर मिळू शकते. 

4/5

असं म्हटलं जातं, ही चहा पावडर फार दुर्मिळ आहे. या चहाची झाडंही आता फार कमी प्रमाणात उरली आहे. त्यामुळे या चहाची पावडरही कमी प्रमाणात मिळते. 

5/5

काही लोकांना हा चहा फार लोकप्रिय असून 10 ग्रॅम चहासाठी अनेकजण 10 ते 20 लाख रुपये खर्च करतात.