Eye Blinking Astrology: डोळे फडफडल्याने काय होते? पुरुषांची डोळे फडफले तर...

Eye Blinking Astrology: सामुद्रिक शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रात डोळे फडफडण्याबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत. हे शुभ किंवा अशुभाचे लक्षणही मानले जाते.  

तेजश्री गायकवाड | Jan 26, 2025, 12:02 PM IST

Eye Blinking Astrology: सामुद्रिक शास्त्र आणि ज्योतिष शास्त्रात डोळे फडफडण्याबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत. हे शुभ किंवा अशुभाचे लक्षणही मानले जाते.

 

1/9

डोळे फडफडणे काय संदेश देते?

कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यांकडे पाहून त्याच्या भावना ओळखता येतात. साधारणपणे तुम्ही वृद्ध लोकांना असे म्हणताना पाहिलं असेल की डोळे फडफडले तर नक्कीच चांगली किंवा वाईट बातमी येते. पण असं का म्हटलं जातं माहीत आहे का? यामागे दडलेला अर्थ काय? स्वप्नांप्रमाणेच यातही काही शुभ किंवा अशुभ चिन्ह आहेत का? डोळे फडफडण्यामागील अर्थ जाणून घेऊयात.

2/9

उजवा डोळा फडफडणे

उजवा डोळा फडफडणे अशुभ मानला जाते. हे काही अडथळे, समस्या किंवा त्रासाचे प्रतीक असू शकते.

3/9

डावा डोळा फडफडणे

महिलांचा डावा डोळा फडफडण्यामागे एक खास गोष्ट लपलेलीअसते. जर एखाद्या महिलेचा डावा डोळा वारंवार फडफडत असेल तर हे एक चांगले लक्षण आहे.  

4/9

नोकरी करणाऱ्या महिलेचे डोळे फडफडले तर

जर एखाद्या नोकरदार महिलेचे डोळे फडफडत असतील तर तिला तिच्या करिअरशी संबंधित काही चांगली माहिती मिळणार आहे.  

5/9

पुरुषांचा डावा डोळा फडफडणे

तर पुरुषांचा डावा डोळा फडफडणे अत्यंत अशुभ मानले जाते. एखाद्या माणसाचा डावा डोळा फडफडत असेल तर त्याचे कोणाशी तरी भांडण होणार आहे असे म्हणतात.

6/9

स्त्री-पुरुषाच्या उजवा डोळा फडफडणे

जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडला तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे. किंवा आर्थिक फायदाही होऊ शकतो.

7/9

स्त्रियांचा उजवा डोळा फडफडणे

तर स्त्रियांचा उजवा डोळा वफडफडणे चांगले मानले जात नाही. त्यामागे एक अशुभ चिन्ह लपलेले असते याचा अर्थ असा होतो की काही न आवडली जाणारी घटना घडणार आहे.  

8/9

दोन्ही डोळे फडफडला तर

जर एखाद्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे दोन्ही डोळे फडफडत असतील तर याचा अर्थ असा आहे की जुन्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे.

9/9

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)