तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट बनावट? केंद्र सरकारने सांगितलं सत्य

Fact Check : सोशल मीडियावर सध्या एक मेसेज फिरत आहे. यात पाचशे रुपयांच्या (Rs 500 Note) नोटवर असलेल्या सीरिअल नंबरमध्ये  (Serial Number) स्टार चिन्ह (* Symbole) असेल तर ती नोट बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका युजरने पाचशे रुपयांच्या स्टार चिन्ह असलेल्या नोटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हा दावा केला आहे.   

| Jul 27, 2023, 20:02 PM IST
1/5

सोशल मीडियावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटसंदर्भातील एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 500 रुपयांच्या नोटचा फोटो देण्यात आला आहे. या नोटच्या सीरिअल नंबरमध्ये स्टार चिन्ह (*) आहे. ही पोस्ट करणाऱ्या युजरने स्टार चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट बनावट असल्याचा दावा केला आहे.

2/5

त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, सघ्या बाजारात 500 रुपयांची बनावट नोट आली आहे. अशा बनावट नोटांपासून लोकांनी सावधान राहाण्याची गरज आहे. तसंच या व्यक्तीने आपला मेसेज जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचं आवाहनही केलं आहे.

3/5

युजरने दावा केला आहे की 500 रुपयांच्या नोटवर असलेल्या सीरिअल नंबरमध्ये स्टार चिन्ह असलं की समजायचं की ती नोट बनावट आहे. याबरोबरच त्याने नोटचा फोटोही शेअर केला आहे. त्या व्यक्तीने म्हटलंय, एका बँकेने स्टार चिन्ह असलेल्या 500 नोटा घेण्यास नकार दिला. अशा नोटा बँकेने परत केल्या. 

4/5

सोशल मीडियावर स्टार चिन्ह असलेली पाचशे रुपयांची नोट व्हायरल झाल्यानंतर सरकारने उत्तर दिलं आहे. प्रेस इनफॉर्मेशन ब्यूरो अर्थात पीआयबीने ती पोस्ट फेक आणि लोकांमध्ये संभ्रम करणारी असल्याचं म्हटलं आहे.  सीरिअल नंबरमध्ये स्टार चिन्ह असणाऱ्या पाचशेच्या नोटा बनावट असल्याचा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे. 

5/5

अशा चुकीच्या पोस्टपासून सावध राहण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. नोदबंदीनंतर डिसेंबर 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा नोट छापल्या होत्या. त्यावेळी सीरिअल नंबरमध्ये स्टार चिन्ह देण्याचा आरबीआयचा विशिष्ट उद्देश होता.