पैशासाठी होकार, पण 20 वर्षं वाट पाहावी लागली; अन् Farooq Sheikh यांना मिळालं होतं चित्रपटाचं मानधन

फारुख यांना करिअरच्या कितव्या वर्षी आणि किती मानधन मिळालं तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्यांच्या करिअरविषयी थोडं जाणून घेऊया. फारुख शेख यांचे वडील हे एक वकील होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी देखील वकील व्हावे. पण त्यांच्या नशिबात दुसरंच काही होतं.   

Mar 25, 2023, 12:59 PM IST

Farooq Sheikh Birthday : बॉलिवूड अभिनेता फारुख शेख (Farooq Sheikh) आज या जगात नसले तरी देखील त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांचे चाहते आजही त्यांचे चित्रपट पाहतात. जर फारुख आज या जगात असते तर त्यांचा आज 75 वा वाढदिवस असता. फारुख यांचा जन्म 5 मार्च 1948 साली गुजरातच्य वडोदरा जिल्ह्यातल्या अमरोळी येथे झाला होता. फारुख यांनी करिअरची सुरुवात ही गरम हवा या चित्रपटातून केली होती. पण तुम्हाला माहितीये फारुख यांना त्यांच्या अभिनय क्षेत्राच्या करिअरमध्ये पहिल्या चित्रपटातील मानधन हे त्यांना 20 वर्षांनी मिळालं होतं. 

1/6

Farooq Sheikh

फारुख जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. जेव्हा फारूख ही नोकरी करत होते, तेव्हा त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली होती. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्य यासाठी तयार नव्हते. दरम्यान, फारूख यांनी जेव्हा पटकथा सांगितली तेव्हा त्यांनी चित्रपटासाठी होकार दिला. 

2/6

Farooq Sheikh

इतकं होऊनही फारूख यांना पहिली ओळख ही बाजार या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात फारूख यांना अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. 

3/6

Farooq Sheikh

राज्य सभा टीव्हीच्या टॉक शोमध्ये पहिल्या मानधनाविषयी फारूख यांनी खुलासा केला. फारुख यांनी सांगितले की त्यांनी फक्त 750 रुपयाच्या लालसे पोटी चित्रपटाला होकार दिला होता. 

4/6

Farooq Sheikh

फारुख यांनी दिग्दर्शक एमएस सत्यु यांच्या ‘गर्म हवा’ या चित्रपटाला केवळ 750 रुपयाच्या लालसे पोटी होकार दिला होता. त्याकाळात 750 रुपये हे खूप होते. 

5/6

Farooq Sheikh

फारूख यांनी पैशासाठी हा चित्रपट करण्याचं ठरवलं पण त्यांना सत्यु यांनी तब्बल 20 वर्षांनी पैसे दिले होते. 

6/6

Farooq Sheikh

दरम्यान, फारूख यांनी 27 डिसेंबर 2015 रोजी दुबईत अखेरचा श्वास घेतला.