पोस्ट ऑफिस एफडी की नॅशनल सेव्हिंग स्कीम? 2 लाखाच्या गुंतवणुकीवर कुठे जास्त फायदा?

 पोस्ट ऑफिस एफडी व्यतिरिक्त, तुम्ही तुमचे पैसे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवून ठेवू शकता. हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे.

| May 05, 2024, 06:18 AM IST

FD VS NSC Fixed Deposit Post Office scheme: पोस्ट ऑफिस एफडी व्यतिरिक्त, तुम्ही तुमचे पैसे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवून ठेवू शकता. हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे.

1/8

पोस्ट ऑफिस एफडी की नॅशनल सेव्हिंग स्कीम? 2 लाखाच्या गुंतवणुकीवर कुठे जास्त फायदा?

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

FD VS NSC Fixed Deposit Post Office scheme:चांगले व्याज देणारी, कर वाचणारी सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनांमध्ये हा दुहेरी फायदा मिळू शकतो. बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला चांगला नफा मिळतो.

2/8

टॅक्स फ्री एफडी

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

चांगले व्याज दर आणि टॅक्स बेनिफिट हवे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट असे म्हणतात. तसेच 5 वर्षांच्या एफडीला करमुक्त एफडी असेही म्हणतात.

3/8

करात सवलत

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

पोस्ट ऑफिस एफडी व्यतिरिक्त, तुम्ही तुमचे पैसे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवून ठेवू शकता. हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला चांगले व्याज तर मिळेलच पण करात सवलतदेखील मिळेल. 

4/8

किती रिटर्न्स मिळेल?

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

सध्या पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 7.5 टक्के दराने व्याज मिळते. तर NSC मध्ये 7.7 टक्के दराने व्याज मिळते.तुम्ही 2 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 5 वर्षांच्या एफडीवर किती रिटर्न्स मिळेल? तसेच 5 वर्षाच्या एनएससीवर तुम्हाला किती रिटर्न्स मिळेल? जाणून घेऊया.

5/8

पोस्ट ऑफिस FD आणि NSC चे रिटर्न्स

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

तुम्ही पोस्ट ऑफिस FD मध्ये 2 लाख रुपये गुंतवल्यास सध्याच्या दरानुसार 7.5 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला 89 हजार 990 इतकी व्याजाची रक्कम मिळेल. हे सर्व मिळून तुमची मॅच्युरिटी रक्कम 2 लाख 89 हजार 990 रुपये इतकी असेल. 

6/8

एनएससीमध्ये 2 लाख रुपये गुंतवल्यास

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एनएससीमध्ये 2 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला त्यावर 5 वर्षांत 7.7 टक्के दराने 89 हजार 807 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2 लाख 89 लाख 807 रुपये इतकी रक्कम मिळेल.

7/8

जास्त व्याज असूनही NSC वर कमी परतावा का?

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

जर तुम्ही इथली गणिते पाहिली तर तुम्हाला दोन्हीच्या परताव्यात थोडासा फरक दिसेल. NSC वर जास्त व्याजदर जास्त असूनही परतावा कमी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर दुसरीकडे एफडीवर कमी व्याजदर असूनही तुम्हाला तुलनेत जास्त रिटर्न्स मिळतात.

8/8

एफडी गुंतवणूक फायदेशीर

FD VS NSC Post Office Fixed Deposit Or National Saving scheme Investment Return Personal Finance Marathi News

पोस्ट ऑफिस एफडीमध्ये व्याजाची मोजणी तिमाही आधारावर केली जाते आणि एनएससीमध्ये ते वार्षिक आधारावर मोजले जाते. त्यामुळे दोघांची तुलना करत असाल तर एफडी गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.