Finance Tips:करिअरच्या सुरुवातीलाच करा 'हे' काम, कधीच पैशांची कमी नाही भासणार

| Jun 30, 2023, 14:45 PM IST
1/7

करिअरच्या सुरुवातीलाच करा 'हे' काम, कधीच पैशांची कमी नाही भासणार

Finance Tips beginning of your career Never Shortage of Money

Career Finance Tips: ग्रॅज्युएशन झाल्यानंतर प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो. चांगला पगार मिळावा, त्यातून चांगली गुंतवणूक करावी आणि भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

2/7

सुरुवातीच्या काळात आर्थिक नियोजन

Finance Tips beginning of your career Never Shortage of Money

तरुणांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक नियोजनाच्या वेळी त्यांच्या बजेटकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांनी त्यांचा खर्च आणि बचत या दोन्हीसाठी वेगळे रक्कम बाजुला काढून ठेवावी.

3/7

भविष्यात पैशांची गरज

Finance Tips beginning of your career Never Shortage of Money

भविष्यात तुम्हाला खूप पैशांची गरज भासण्याची शक्यता आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला यासाठी कर्ज घ्यावे लागेल. ही कर्जे तुम्हाला मानसिक गोंधळातही टाकू शकतात.

4/7

आर्थिक नियोजनात बचत

Finance Tips beginning of your career Never Shortage of Money

तुमच्या आर्थिक नियोजनात बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या नियमित खर्चानंतर तरुणांनी त्यांच्या नियमित बचतीकडेही लक्ष दिले पाहिजे. 

5/7

20% बचत

Finance Tips beginning of your career Never Shortage of Money

तुम्ही तुमच्या पगारातील काही रक्कम म्हणजे मासिक आधारावर 20% बचत केली पाहिजे. हे तुमच्या भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी देखील खूप उपयुक्त ठरेल.

6/7

आर्थिक नियोजन

Finance Tips beginning of your career Never Shortage of Money

जर तुम्ही आर्थिक नियोजनाचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला योग्य गुंतवणुकीचीही माहिती असायला हवी. जर तुम्ही तुमचे पैसे बचत खात्यात गुंतवले तर बँक तुम्हाला त्यावर कमी व्याज देते आणि ते नेहमी खर्च होण्याची शक्यता असते.

7/7

म्युच्युअल फंडात गुंतवणूक

Finance Tips beginning of your career Never Shortage of Money

म्हणूनच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले राहील. तथापि, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला सखोल संशोधन करणे आवश्यक आहे.