26/7 : 'शहर बुडालं, माणसं वाहून गेली', महाप्रलयाची 19 वर्ष... मुंबईने काय धडा घेतला?

Mumbai 26th July 2005 Flood : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुढचे 24 तास मुंबईकरांसाठी अतिमहत्त्वाचे असल्याचं हवामान खात्याकडून (Department of Meteorology) जाहीर करण्यात आलंय. मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. विशेष म्हणजे ही तारीख आहे 26 जुलै... मुंबईकर कधीच कोणत्या संकटाला घाबरला नाही. पण '26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो. 

| Jul 25, 2024, 19:47 PM IST
1/8

देशाची आर्थिक राजधानी आणि इथे आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न साकारणाऱ्या मुंबई शहराने आजवर अनेक आघात सहन केलेत. बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला अशा अनेक संकटातून मुंबई पुन्हा नव्या उमेदीने उभी राहिलीय. पण एक आघात असा होता, जो मुंबईकर आजही विसरलेला नाही. 26 जुलैचा तो दिवस आठवला कि डोळ्यासमोर उभी राहते पाण्यात बुडालेली मुंबई.

2/8

'26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो.  आज या महाप्रलयाला 19 वर्ष झाली. 26 जुलै 2005 चा तो दिवस. मुंबई शहरात पाऊस नाही तर ढगफुटी झाली होती. मुसळधार पावसाने मिठी नदी कोपली आणि संपर्ण मुंबई पाण्याखाली गेली. तब्बल तीन दिवस मुंबई ठप्प होती.

3/8

महाप्रलय काय असतो हे त्या दिवशी मुंबईकरांनीही अनुभवलं. 25 जुलै 2005च्या रात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार सरी कोसळत होत्या आणि 26 जुलैला पावसाने रौद्ररुप दाखवलं. संपूर्ण मुंबईत पाणी तुंबलं, रेल्वे बंद पडली, रस्ते वाहतूक ठप्प झाली, मुंबईकर जागोजागी अडकून पडले.

4/8

कार्यालयातून घराची ओढ लागलेले मुंबईकर रात्रभर रेल्वे, बसमध्ये अडकली. अगदी दोन तीन दिवस पायपीट करुन काही मुंबईकरांनी घरं कसंबसं गाठवलं होतं. स्वत:चा जीव धोक्यात असतानाही  मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं होतं.

5/8

त्या दिवशी तब्बल 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं. तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली. यामुळे कोट्यवधीचं नुकसान झालं. 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, जो गेल्या तेव्हा 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. 

6/8

मिठी नदी कोपल्याने मुंबई बुडाल्याने मुंबईचा श्वास असलेी लोकल सेवा ठप्प झाली होती. तब्बल 10 ते 12 दिवस लागली मुंबई लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी. 

7/8

बेस्टची डबलडेकर बसही या महापुरात पाण्याखाली गेली होती.  पहिल्यांदाच, मुंबईची विमानतळं मुसळधार पुरामुळे आणि अत्यंत खराब दृश्यमानतेमुळे 30 तासांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात आली होती. 700 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली किंवा उशीर झाला.

8/8

मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. जवळपास 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली.   मुंबईतील इमारती, वस्त्यांमध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार वाहून गेले होते.