...म्हणून टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये वाटणार दीड लाख फ्री कंडोम

Feb 11, 2021, 22:06 PM IST
1/7

एएफपीच्या अहवालानुसार, दीड लाख विनामूल्य कंडोम वाटप केले जाईल याची आयोजकांनी पुष्टी केली आहे, परंतु शक्य तितक्या कमी लोकांना भेटण्याचे आवाहन खेळाडूंना करण्यात आले आहे.

2/7

जागतिक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळात खेळाडूंना कठोर निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी नियम पुस्तक प्रसिद्ध केले आहे. 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकला कोरोनाच्या प्रभावापासून मुक्त ठेवण्यासाठी 33 पानांचे नियम पुस्तक जारी करण्यात आले आहे.

3/7

खेळाडूंना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी हात मिळवू नये आणि एकमेकांना मिठी मारू नये. शारीरिक संपर्काचे अनावश्यक प्रकार टाळावे.

4/7

मार्गदर्शक सूचनांनुसार, दर चार दिवसांत एकदा खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जाईल. जर खेळाडू पॉझिटिव्ह आला तर त्यांना खेळता येणार आहे.

5/7

नियम पुस्तकात असा इशारा देखील दिला आहे की जर त्यांनी कठोर नियम मोडले त्यांना खेळातून वगळले जाईल.

6/7

या नियम पुस्तकाचा आढावा एप्रिल आणि जून महिन्यात घेण्यात येईल आणि आवश्यक असल्यास नियमातही बदल करण्यात येतील. जपानमध्ये येणाऱ्या खेळाडूंना 72 तासात कोरोना चाचणी अहवाल सादर करावा लागेल, असेही नियम पुस्तकात म्हटले आहे.

7/7

जपानमध्ये आल्यानंतर तपासणी केली जाईल. खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात येणार नाही. खेळाडूंना जिम, पर्यटन स्थळे, दुकाने, रेस्टॉरंट्स किंवा बारमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. केवळ अधिकृत गेमच्या ठिकाणी आणि निवडलेल्या ठिकाणी येऊ शकतील.